करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन 

आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

करमाळा प्रतिनिधी – रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी वीट येते करमाळा पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . या आंदोलनामध्ये लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी चाळीस गावातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर योजना मंजूर नाही झाली तर उपस्थित सर्व चाळीसगावातील शेतकरी बांधव निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या चा निर्णय घेण्यात आला .यावेळी माजी सरपंच शहाजीमाने वीट सरपंच महेश गणगे रावगाव सरपंच संदीप शेळके अंजनडोह सरपंच अरुणशेळके राजूरी सरपंच शेळके सरपंच मारकड वंजारवाडी सरपंच प्रवीण बिनवडे पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे कामोने सरपंच नलावडे झरेचे प्रशांत पाटील रामदास झोळ सर . अर्जुन गाडे अंगद देवकते बाळासाहेब टकले अण्णासाहेब सुपनवर गोरख ढेरे सर अभयसिंहराजे भोसले उदय ढेरे बलदोटा काका प्रशांत शिंदे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

हेही वाचा – तक्रार येताच तहसीलदार ठोकडे संतापल्या, कुणबी दाखले काढताना नागरिकांना लूट नका, मोडी वाचकांच्या मानधनाचा प्रस्ताव दाखल

करमाळा कुटीर रुग्णालयाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

यावेळी उपस्थित सर्व सरपंच पदाधिकारी व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आलेले निवेदन मंडल अधिकारी श्री बागवान यांनी स्वीकारले यावेळीपोलीस अधिकारी श्री टिळेकर अझर शेख श्री .दळवी यांनी चौख . पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!