*30 वर्षांनी झाली मित्र मैत्रिणीची भेट*
केत्तूर (अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केतुर ने.2 (ता.करमाळा) येथे इयत्ता दहावी 1995 च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.संस्थेच्या प्रार्थनेने मेळाव्याची सुरवात झाली.उपस्थित सर्व आजी माजी शिक्षकांचे स्वागत विद्यार्थ्यांकडून शाल,श्रीफळ देवून करण्यात आले.सुरवातीला काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रध्दांजली वाहून सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य काशिनाथ जाधव हे होते. सर्वांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांनी 30 वर्षांपूर्वीच्या शालेय व वर्गातील आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील माजी शिक्षकांनीही मौलीक विचार व्यक्त केले. शाळेचे ऋण म्हणून शालेय बागेतील पेव्हर ब्लाॅकसाठी 55 हजार रूपये देणगी बॅचतर्फे देण्यात आली.
कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी प्राचार्य काशिनाथ जाधव,पर्यवेक्षक भिमराव बुरूटे,किशोर जाधवर,लक्ष्मण टाळके,सदाशिव यादव,दिलीप काकडे,शाहीर गायकवाड,शेवाळे मॅडम,कळसाईत मॅडम आदि आजी माजी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन किशोर जाधवर यांनी केले. आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र डरंगे, पंढरीनाथ खाटमोडे, सचिन घाडगे, लहू तनपूरे, तानाजी मोहिते, भाऊ मोरे, राजेंद्र चव्हाण पाटील, मुकूंद पानसरे, आमोल शिंदे, मनोज ढोबळे, सतिश सुपेकर, मनोज मारवाडी, पिंटू आगवणे,शंकर जाधव, कविता खाटमोडे, मनिषा कानतोडे, शुभांगी पाटणे, मंगल सरवदे-पाटील, वैशाली जाधव आदि उपस्थित होते.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा केत्तूर येथील नेताजी प्रशालेत निषेध
सोशल मीडियामुळे मैत्रीचा पुनर्जन्म –
सोशल मीडिया समाजासाठी शाप की वरदान अशी चर्चा सर्वत्र होत आहे मात्र त्याचा योग्य उपयोग केल्यास तो नक्कीच समाजाच्या हिताचा ठरू शकतो याचा प्रत्यय यावेळी आल्याचे अनेकांनी सांगितले.शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकमेकांना भेटले असल्याने सोशल मीडियामुळेच मैत्रीचा पुनर्जन्म झाल्याची भावना यावेळी राजेंद्र डरंगे यांनी व्यक्त केली.