तालुक्यात 10 वीच्या परीक्षा सुरळीत सुरू

10 वीच्या परीक्षा सुरळीत सुरू

केत्तूर (अभय माने ) केत्तूर तालुका करमाळा येथील नेताजी सुभाष विद्यालयात दहावी (माध्यमिक शालांत) परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून एक मार्चपासून परीक्षा सुरळीत सुरू झाले आहेत . या केंद्रात एकूण 302 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

या केंद्रावर सावडी, कुंभारगाव, भिलारवाडी, कोर्टी, कात्रज विद्यालयातील 145 विद्यार्थीही परीक्षा देत आहेत एकूण बारा खोल्यांमध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली असून एका खोलीत 25 विद्यार्थी परीक्षा देतील.या परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून दिलावर मुलानी तर उपकेंद्र संचालक म्हणून भीमराव बुरुटे व किशोर जाधवर यांना नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – उच्च ध्येय गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक; प्रा. गणेश करे-पाटील यांचे प्रतिपादन, यशकल्याणी संस्थेचे बागल विद्यालयास केले एकवीस हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

परीक्षेचा पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटे विद्यार्थ्यांना जास्त देण्यात आले असून, या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
1 मार्च ते 26 मार्च दरम्यान चालणाऱ्या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात 10.30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

karmalamadhanews24: