करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद शाळा गौळवाडीची चिमुकली स्नेहल फाळके वादविवाद स्पर्धेत प्रथम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर ( राजाराम माने ) : जिल्हा परिषद विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी { Talent hunt 2019-20} कोर्टी बीट स्तरीय स्पर्धा केंद्र शाळा केत्तूर २ येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौळवाडी( ता.करमाळा) येथील विद्यार्थीनी स्नेहल नवनाथ फाळके ,इयत्ता चौथी हिने वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थीनी म्रुणाल महावीर गोरे हिने एकपात्री नाटक स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम सादरीकरण केले.

वर्गशिक्षिका विजयालक्ष्मी राऊत-गोरे यांनी यासाठी परिश्रम घेतले.व शाळेचे मुख्याध्यापक तान्डेन यांनी मार्गदर्शन केले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ फाळके व सर्व सदस्य यांनी स्नेहल व म्रुणाल चे अभिनंदन व कौतुक केले.

हेही वाचा👇👇 ‘राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना, आता तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या ‘नगर-टेंभुर्णी’ महामार्गाचे काम होणार का.?

litsbros

Comment here