पुणेराजकारण

२०१९ ला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रयत्नशील राहणार -सभापती प्रवीण माने

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रतिनिधी (आकाश भोसले) : सोनाई परिवाराकडून सर्वधर्मीय विवाह सोहळा उत्साहात पार पडला.या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक उपस्थित होते.शेतकरी बांधवांची दुष्काळाबाबतची चिंता पाहून हा सर्वधर्मीय विवाह सोहळा आयोजित केला असल्याचे सोनाई परिवाराने सांगितले.यावेळी भाषणात माने म्हणाले,विकासकामानिमित्त पाहणी करायला गावा-गावात जात असताना दुष्काळाची जाणीव झाली.एक भाऊ म्हणून आज लग्न सोहळ्याची जबाबदारी उचलली आहे.मागेच हजारो सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये ११४० तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली.रामदेवबाबा,श्री.श्री.रविशंकर यांची योगशिबीरे तालुक्यातील जनतेसाठी आयोजित केली.इंदापूर तालुक्यासाठी १२५ कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात आणला.येणाऱ्या पुढच्या काळात ऊस,डाळींब आणि दूध उत्पादनाबाबत परिसंवाद आयोजित करण्याचा विचार आहे.

मात्र हे सर्व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला दिलेल्या संधीमुळेच शक्य झाले.मी स्वामी समर्थ महाराजांचा भक्त आहे आणि २०१९ ला अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणवून पाहायचे आहे.असा नवस सुद्धा आपण केलेला असल्याचे सभापती माने यांनी यावेळी बोलून दाखवला.सोनाई परिवार सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवित राहणार असल्याचे माने माध्यमांशी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here