करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमाढाराजकारण

रणजितसिंह निंबाळकर पुढच्या निवडणूकीत वंचित आघाडीत जातील : त्यांच्या कारनाम्यांमुळे मला आडनाव बदलावेसे वाटते

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

फलटण (करमाळा माढा न्युज) : रणजितसिंह नाईक निंबाळकर आधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपमध्ये गेले आहेत, पुढच्या निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीत दिसतील, असा टोला विधानपरिषद अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माढा लोकसभा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लगावला. त्यांनी ज्यांच्याशी नाते ठेवले, त्यांचे वाटोळे झाले आहे. त्यांच्या कारनाम्यांमुळे मला आडनाव बदलावेसे वाटते, असे टीकास्त्रही त्यांनी रणजितसिंह यांच्यावर सोडले.

सातारा जिल्ह्यात नाईक निंबाळकर एकटेच नाहीत. आम्ही वेगळे आणि ते वेगळे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भावकी नाही. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खोड मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. ते संजयमामा शिंदे यांच्या फलटण येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.

शरद पवार सांगतील तेच विकासाचे राजकारण आमच्याकडे चालते. आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी या प्रचारसभेत दिली. या प्रचारसभेला उमेदवार संजय शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here