देश/विदेशराजकारण

महाराष्ट्रा पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये भाजपला झटका विधानसभा पोट निवडणुकीत सर्व उमेदवार पराभूत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोलकाता- महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झालीये. आता या धक्क्यातून भाजप आणखं सावरलेलं नसताना पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 3 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांत तृणमुल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

भाजपची अहंकारी वृत्त आणि भाजपने धरलेला एनआरसीचा धरलेला आग्रह या विरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

कालियागंज मतदारसंघातून तृणमुल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा 2418 मतांनी पराभव केला. खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा पराभव केला. तर करीमपूरमधून तृणमुलच्या सिन्हा रॉय यांनी भाजपच्या मजुमदार यांचा पराभव केला.

litsbros

Comment here