करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणसोलापूरसोलापूर जिल्हा

मराठा आरक्षण वैध ठरल्याबद्दल सोलापूरात आनंदोत्सव

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर (२७ जून) – आज मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सशर्त वैध ठरविल्याने सोलापूरात मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन मिठाईचे वाटप केले. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर केल्याने मराठा समाजाला मोठे यश मिळाले नसून आरक्षण मिळण्यासाठी ज्या ४२ समाज बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आज त्यांना या मिळालेल्या आरक्षणाची श्रद्धांजली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकार, मागासवर्गीय आयोग आणि उच्च न्यायालयाचे आभार मानत आता केंद्रात आरक्षण मिळविण्यासाठी येत्या काळात हा लढा असेच कायम ठेवणार असल्याचेही सांगितले.

litsbros

Comment here