ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय घडामोडीशैक्षणिकसोलापूर जिल्हा

मराठा आरक्षण असंविधानिक, न्यायालय कार्यकर्त्या प्रमाणे वागलं, भारतीय संविधान नेस्तनाबूत केलंय : ऍड.गुणरत्न सदावर्ते

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा न्यूज(प्रतिनिधी) : आज उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा बाबत दिलेला निकाल हा असंविधानिक असून संविधानाला नेस्तनाबूत करणारा आहे, या निकालाला आपण सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत असे परखड मत व्यक्त करत ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयावर अनेक गंभीर आरोप करत अनेक बाबींवर लक्ष वेधले.

आज कोर्टाने निकाल देण्या आधीच भाजपच्या मंत्र्यांनी निकाल आपल्या बाजूने लागणार आहे, मराठा आरक्षण दिले अशा अभिनंदनाच्या पोस्ट शेअर कशा केल्या ..? हा निकाल आधीच ठरला होता अन तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांना माहीत होता असा सनसनाटी आरोप ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. या निकालात सरकारने आक्षेप केला का.? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या आरक्षणाने खुल्या वर्गाचं पूर्ण वाटोळं झालं आहे असेही ते म्हणाले.

litsbros

Comment here