ताज्या घडामोडीदेश/विदेशमहाराष्ट्ररोजगार

पोस्टाची जबरदस्त योजना, फक्त 200 रुपये जमा करून तुम्हाला मिळतील 21 लाख.!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सर्वसामान्य माणसाला पैसा जमा करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात, पण मोठी रक्कम उभी राहत नाही. असा अनुभव आपण सगळेच घेत असतो, पण डाक पोस्टाने एक छान स्कीम आणली आहे. जी तुम्हाला मिळवून देऊ शकते थेट 21 लाख रुपये. वाचा मग सविस्तर…

काही वर्षातच जमा होईल 21 लाखांचा फंड

दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या बचतीची सवय तुम्हाला भविष्यातील एक मोठी जमापुंजी जमा करण्यासाठी मदत करत असते. हाच बचतीचा मार्ग तुम्हाला इथे अवलंबायचा आहे. रोजच्या खर्चातून फक्त दोनशे रुपये तुम्हाला सेव्ह करायचे आहेत. आज केलेली ही बचत येत्या काही वर्षात तुम्हाला लखपती बनवू शकते आणि या बचतीच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकता. पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट म्हणजेच पीपीएफ हा सद्यस्थितीचा बचतीचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या या अकाउंटमध्ये रोज दोनशे रुपयांची बचत करायची आहे. जर तुम्ही रोज हे करू शकला, तर स्किम संपेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये 21 लाखांचा फंड जमा झालेला असेल.

कोणत्याही शाखेत हे अकाउंट ओपन करू शकता

पोस्ट ऑफिसच्या देशभरातील कोणत्याही शाखेत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही एकापेक्षा अधिक अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. याशिवाय दोन व्यक्ती मिळून सुद्धा हे अकाउंट तुम्ही ऑपरेट करू शकता.

असे मिळतील 21 लाख रुपये
समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही आजपासून आपल्या दैनंदिन जीवनातील रकमेतील दोनशे रुपये रुपयांची बचत करत आहात. ही अशी बचत तुम्हाला पंधरा वर्ष करायची आहे. पंधरा वर्षानंतर तुम्हाला 21 लाखांचा मोबदला मिळणार आहे.

कसा तयार होईल फंड
1. या स्कीमच्या माध्यमातून जर तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत करू इच्छिता तर याप्रमाणे महिन्याचे सहा हजार रुपये होतात, म्हणजेच एका वर्षाचे झाले 72 हजार रुपये.
2. जर तुम्ही अशा पद्धतीने लागोपाठ पंधरा वर्षे बचत केलीत तर 15 व्या वर्षापर्यंत तुम्ही बचत केलेली रक्कम 10 लाख 80 हजार रुपये इतकी असेल.
3. तुम्ही जमा केलेली रक्कम ही पीपीएफ अकाउंट मध्ये असल्यामुळे त्या रकमेवर वार्षिक 8 टक्क्यांनी तुम्हाला व्याज मिळेल. ही व्याजाची रक्कम तुम्ही जमा केलेल्या रकमेत समाविष्ट केली जाईल.
4. याच पद्धतीने पंधरा वर्ष त्या रकमेवर व्याज मिळाल्यानंतर तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम 21 लाख रुपये असेल.
5. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही केलेल्या बचतीवर तुम्हाला तब्बल 10 लाख 31 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला 10 लाख 31 हजारांचा अतिरिक्त फायदा होणार आहे

litsbros

Comment here