ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यात बापट विरुध्द जोशी लढत होणार : काँग्रेसची 9 वी यादी जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुणे – काँग्रेसकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील उमेदवाराचा सुरु असलेला तिढा कायमचा सुटला आहे. काँग्रेसने पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी 9 वी यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी उत्सुक आहे. गेली 38 वर्षे पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करीत असून कधीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे तिकिटासाठी पक्षश्रेष्ठी निष्ठेचा विचार करतील, असा विश्वास आमदार मोहन जोशी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी बोलून दाखवला होता. मात्र, एकनिष्ठेच्या निकषाला धरुन 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मोहन जोशी हे काँग्रेसचे माजी आमदार असून एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. विधान परिषदेच्या आश्वासन समितीवर आमदार मोहन जोशी यांची 2012-14 मध्ये फेरनिवड करण्यात आली होती.

पुणे शहर काँग्रेस कार्यालयात जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारही सुरु केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अनेक नावांची चर्चा सुरु होती. अरविंद शिंदे, सुरेखा पुणेकर तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाडही पुणे लोकसभा जागेसाठी इच्छुक होते. मात्र इच्छुक उमेदवारांपैकी कोणत्याचा नावाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला नाही. अखेर काँग्रेसच्या हायकमांडने पक्षनिष्ठतेचा निकष पाळल्याचे या उमेदवारीवरुन दिसून येते.

litsbros

Comment here