करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरपुणेमहाराष्ट्रमाढाराजकारणशैक्षणिकसोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

निवडणुकीमुळे बदल : 22 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा आता मे मध्ये होणार : क्लीक करून वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर(करमाळा माढा न्युज) : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे येत्या 22 एप्रिल रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासकांच्या परीक्षा आता पुढील महिन्यात 5 मे रोजी होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा याआधीच विद्यापीठाने रद्द केले आहेत. आता 22 एप्रिल रोजी होणाऱ्या बीए, बीकॉम, बीएससी आणि बीएससी(इ. सी. एस., इंटरपिनर्शिप, बायोटेक) अभ्यासक्रमांच्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून संबंधित परीक्षा पाच मे रोजी होणार आहेत. ज्या- त्या परीक्षा केंद्रांवरच या परीक्षा संबंधित वेळेत होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

माढा लोकसभा मतदार संघातील अकलूज, माढा, करमाळा, सांगोला या परिक्षेत्रातील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लागले आहे. तसेच 22 एप्रिल रोजी संबंधित परीक्षा केंद्र निवडणुक आयोग ताब्यात येणार असल्याने या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाल्याचे डॉ. कोकरे यांनी सांगितले. याची संबंधित विद्यार्थी, परीक्षार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
litsbros

Comment here