सोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी यांच्या जुन्या घराची अभ्यासिका झाल्याने सार्थक झाले : शरद पवार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर (२१ फेब्रुवारी) – दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित आणि भटक्या समाजासाठी वेचले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे सुपुत्र दलितमित्र भारत जाधव वाटचाल करत आहेत. गुरुजी ज्या घरात राहत होते त्या घराचे नूतनीकरण करून त्यामध्ये चिरंजीव भारत यांनी गरीब मुलांसाठी अभ्यासिका व भटक्या समाजासाठी वाचनालय सुरु करून गुरुजींच्या जुन्या घराचे खऱ्या अर्थाने सार्थक केले असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी काढले.
उमेदपूर लिमयेवाडी येथे दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उदघाटन आज गुरुवारी सायंकाळी होणार होते. परंतु शरदचंद्र पवार यांचा अचानक सोलापूर दौरा ठरल्यानंतर आणि पवार हे रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात येणार असल्याचे समजल्यानंतर संकुलात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिका व वाचनालयाची चित्रफीत तयार करण्यात आली आणि शरद पवार यांनी लॅपटॉपवर ऑनलाईन बटन दाबून वाचनालयाचे उदघाटन केले. यावेळी पवार यांनी दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी यांच्या कार्याचा गौरव केला.
सेटलमेंट , राजस्व नगर, आदित्य नगर, प्रताप नगर, लिमयेवाडी तसेच शहानगर या परिसरात भटक्या समाजासाठी एकही वाचनालय नव्हते. त्यासाठी वडील भीमराव गुरुजी ज्या घरात राहत होते ते जुने घर तसेच ठेऊन त्याचे नूतनीकरण करण्यात येऊन त्यामध्ये विध्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व वाचनालय सुरु करून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दलितमित्र भारत जाधव यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार , माजी महापौर मनोहर सपाटे, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, महिला निरीक्षक निर्मला बावीकर, शहराध्यक्षा सुनीता रोटे, सायरा शेख, शिवराज जाधव आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here