आरोग्यकरमाळा

जिंती येथील आयुर्वेदिक दवाखान्यात मोफत औषध गोळ्या पुरवठा करावा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिंती येथील आयुर्वेदिक दवाखान्यात
प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या मोफत औषध गोळ्या पुरवठा करावा. – सवितादेवी राजेभोसले


केतूर (राजाराम माने); जिंती (ता.करमाळा) येथील आयुर्वेदिक दवाखाना हा महाराष्ट्रातील पहिला आएसओ दवाखाना असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश बंद असून सर्वसामान्य कुटूंब आर्थिक अडचणीत आहे.

Advertising

जिंती आयुर्वेदिक दवाखान्यात पश्चिम भागातील २० ते २५गावातील लोक उपचारासाठी येत असून उपचार व आयुर्वेदिक गोळ्या मोफत दिल्या जातात.परंतु आयुर्वेदिक गोळ्या वगळता औषध गोळ्या बाहेरील मेडिकलमधून घ्याव्या लागतात.

परंतु सद्याच्या परिस्थितीत सर्वच नागरिकांना खोकला सर्दी तसेच इतर आजारावर गोळ्या व औषध बाहेरील मेडिकलमधून घेणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झालेले असून तातडीने अत्यावश्यक म्हणून जिंती आयुर्वेदिक दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली जाणारी मोफत औषध गोळ्यांची सोय 3 महिन्यासाठी अत्यावश्यक जिंती आयुर्वेदिक केंद्रात उपलब्ध करून द्यावी.

Advertise

हेही वाचा- ..म्हणून बंद आहेत करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकाने; होलसेल ही आणता येईना, नागरिक हवालदिल

रेशन दुकानदारांनी वेळेत व प्रत्येक कार्डधारकांना धान्य वाटपाची अंमलबजावणी करा

अशी मागणी सवितादेवी राजेभोसले (सदस्या जि. प. सोलापूर) यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे केली आहे. तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्दी ,पडसे, खोकला यावरील औषधांचा पुरवठा आरोग्य विभागाने त्वरित करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

litsbros

Comment here