ताज्या घडामोडीमाढाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

चारा छावणीच्या मागणीसाठी माणसांसह जनावरे ही उपोषणाला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बारलोणी(करमाळा माढा न्युज) : चारा छावणी सुरू करावी , व्होळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून टँकर मध्ये पाणी भरण्याची सोय करावी , थकित असलेले दुधाचे अनुदान त्वरित जमा करण्यात यावे या मागण्या साठी कुर्डू ( ता .माढा ) येथे माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे . उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे .

येथील शिवाजी चौकात सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी दुभती जनावरे आणुन बांधण्यात आली आहेत .या आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात आले येईल असा इशारा देण्यात आला आहे .

litsbros

Comment here