अक्कलकोटताज्या घडामोडीपंढरपूरपंढरपूरबार्शीमंगळवेढामाढामाळशिरसराजकारणसांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

खासदार सुप्रिया सुळे शनिवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी सावरण्याचा प्रयत्न.!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

 

सोलापूर आणि मोहोळमध्ये विद्यार्थी, वकील, डॉक्टर, व्यापारी आणि अभियंत्यांशी साधणार सुसंवाद

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – खासदार सुप्रिया सुळे शनिवार २७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . शहर आणि ग्रामीण भागात विद्यार्थी, वकील, डॉक्टर, व्यापारी आणि अभियंत्यांशी खासदार सुप्रिया सुळे संवाद साधणार असून सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातील नेते ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेऊन खासदार सुप्रियाताई मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे शनिवारी सकाळी बारामती येथून पंढरपूरकडे प्रयाण करतील. सकाळी सव्वा आठ वाजता पंढरपुरात देवदर्शन करतील. त्यानंतर सकाळी सव्वा नऊ वाजता मोहोळ तालुक्यातील अनगरकडे रवाना होतील. सव्वा दहा वाजता अनगर येथे आगमन झाल्यानंतर सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील महाविद्यालयातील विध्यार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दुपारी १२ ते पावणे एकपर्यंतची वेळ राखीव आहे. त्यानंतर पावणे एक वाजता त्यांचे मोहोळकडे प्रयाण होईल. दुपारी १ ते २ यावेळेत मोहोळ येथे वकील,व्यापारी,डॉक्टर आणि व्यावसायिकांशी सुप्रियाताई सुसंवाद साधतील. दुपारी २ वाजता त्यांचे मोहोळ येथून सोलापूर शहराकडे प्रयाण होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेते,प्रांतिक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुप्रियाताई मार्गदर्शन करणार आहेत .

सर्वात लोकप्रिय ऑनलाईन न्यूज पोर्टल ‘करमाळा माढा न्यूज’ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9067564080

दुपारी साडेचार वाजता रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर साडेपाच वाजता डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात सोलापुरातील वकील,व्यापारी,डॉक्टर आणि अभियंत्यांशी खासदार सुप्रियाताई सुसंवाद साधणार आहेत . त्यानंतर दमाणी नगरातील अंध शाळेला भेट देणार आहेत . त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये विद्यार्थी संवाद होईल. त्यानंतर खासदार सुप्रियाताई रात्री ८ वाजता जेष्ठ नेते मनोहरपंत सपाटे यांच्या शरद नागरी सहकारी बँकेला भेट देणार आहेत. या कार्यक्रमानंतर वेळ राखीव असून खासदार सुप्रियाताई सुळे रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.

litsbros

Comment here