करमाळा

करमाळा येथील बँक ऑफ शाखेचा 45 वा वर्धापन दिना उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा (प्रतिनिधी) :- ग्राहकाला सेवा देणे हे बँकेचे अद्य कर्तव्य् असून बँकाचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी आम्हीं बचत गट, महिला सक्षमीकरण, अल्प् उत्पन्ना गटातील नागरिकांना कर्ज वाटप करणे, शेतकरी पुरक व शेतीवर कर्ज देणे, या गोष्टी प्राधान्याने करत असताना बँक व ग्राहक यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी बँकेकडे ग्राहकाने एकीकडे ठेवी ठेवल्या पाहिजेत तर दुसरीकडे बँकेने कर्ज पुरवठा केलेल्या कर्जदारांनी वेळेवर कर्ज भरले पाहिजे असे मत बँक ऑफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक अजय कडू यांनी व्यक्त् केले.

करमाळा येथील बँक ऑफ शाखेच्या 45 व्या वर्धापन दिना निमित्त् आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य् ॲड.राहुल सावंत, पो.नि.सर्जेराव पाटील, शाखा अधिकारी मनोज खैरनार, डॉ.रविकिरण पवार, वनक्षेत्रपाल नलवडे, ॲड.सचिन लोंढे, ॲड.अलिम पठाण, दिपक चव्हाण, आदिंच्यासह ग्राहक, शेतकरी, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थितीत होत्या.

यावेळी बोलताना ॲड.राहुल सावंत म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकानी गरीब, शेतकरी, शेतमजूर, हमाल, कष्टकरी महिला, छोटे मोठे व्यवसाय करणारे घटक यांना प्राधान्याने कर्ज दिले पाहिजे. या घटकांना कर्ज देवून त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी मदत केली पाहिजे.

आज बँका सुरक्षित व्यवसाय करण्यासाठी मोठया कर्जदारांना कर्ज देण्यावर भर देतात. मात्र अल्प् उत्पन्नतील घटकावर कर्ज देण्यासाठी त्या टाळाटाळ करतात. ही गोष्ट योग्य् नसून समाजातील लहान घटकांना जास्तीत जास्त् कर्ज देण्यावर बँकांनी भर द्यावा आणि
कर्जदार यांनी सुध्दा घेतलेले कर्ज वेळेत भरणे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा या बँकेचे काम कौतुकास्पद असून या ठिकाणी ग्राहकांला तत्पर सेवा देण्याचे काम केले जाते. मागेल त्याला कर्ज, देण्याची भुमिका या बँकेची असल्यामुळे या बँकेचे जाळे ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये पसरलेले आहे ही त्यांच्या कामाची पावती आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पो.नि.सर्जेराव पाटील, शाखा अधिकारी मनोज खैरनार, डॉ.रविकिरण पवार, दिपक चव्हाण आदिंची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितिन आढाव सर यांनी केले. तर आभार राऊत यांनी मानले.

litsbros

Comment here