ताज्या घडामोडीपंढरपूरपुणेमहाराष्ट्रमाढामुंबईराजकारण

आ.दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत नंदीवाला समाजासाठी केली हक्काच्या जागेची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुंबई(प्रतिनिधी- आकाश भोसले) : दि.२६.मौजे वडापुरी ता. इंदापूर या ठिकाणी संपुर्ण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जमातीतील प्रमुख असलेल्या नंदीवाला समाजाचे आराध्य दैवत अंबाजी लिंबाजी देवस्थान मौजे वडापुरी येथे असून सदर देवाची यात्रा ही तीन वर्षांतून एकदा भरते व ती महीनाभर असते. या यात्रेसाठी उदरनिर्वाहासाठी संपूर्ण राज्यामध्ये तसेच इतर राज्यातील भटकंती करत असलेला संपूर्ण नंदीवाला समाज यात्रेच्या निमित्ताने एकत्रित येत असतो. सदर यात्रेप्रसंगी या ठिकाणी नंदीवाला समाजाला हक्काची जागा नसल्याने गैरसोय होत असून मौजे वडापुरी गावातील व गावालगत असणारे सरकारी गायरान क्षेत्र हे यात्रेसाठी राखीव ठेऊन या समाजासाठी यात्रेसाठी नावावर करण्याची मागणी या समाजाची आहे. यासाठी तसा प्रस्तावही शासनाकडे म्हसुल विभागाकडे सादर केला असल्याचे आमदार श्री भरणे मामा यांनी यावेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले तसेच या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन या उपेक्षित, दुर्लक्षित ,वंचित घटक मानल्या जाणाऱ्या माझ्या नंदीवाला समाजाला तातडीने न्याय द्यावा अशी मागणी मा. म्हसुल मंत्री महोदय यांचेकडे इंदापूर तालूक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने करीत असल्याचे आमदार भरणे मामा यांनी यावेळी सभागृहात सांगितले.

संपूर्ण भारत देशातील बहुजन, भटक्या विमुक्त, तसेच समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या सेवेसाठी व त्यांच्या उत्कर्षासाठी जीवन वेचलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी भटक्या विमुक्त जमातीतील नंदीवाला समाजाच्या हक्काच्या प्रश्नांसाठी विधानसभेच्या सभागृहात मागणी केल्याने खरोखर आज शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार श्री भरणे मामा यांनी आदरांजली अर्पण केली.तसेच नंदीवाला समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणारे आमदार भरणे हे विधानसभेमध्ये एकमेव आमदार ठरल्याने इंदापूर तालुक्यातील नंदीवाला समाजाने आमदार भरणे यांचे आभार मानले .

litsbros

Comment here