करमाळाशैक्षणिक

‘आदर्श शाळा’ उपक्रमात करमाळा तालुक्यातील ‘या’ एकमेव जिल्हा परिषद शाळेची निवड; जिल्ह्यातील केवळ 10 शाळा

‘आदर्श शाळा’ उपक्रमात करमाळा तालुक्यातील ‘या’ एकमेव जिल्हा परिषद शाळेची निवड; जिल्ह्यातील केवळ 10 शाळा

केतूर ( अभय माने)– शिक्षण विभागाकडून राज्यभरातून ३०० जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १० शाळांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत परिपत्रक काढण्यात आलेला आहे. करमाळा तालुक्यातील एकमेव वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आलेली आहे.प्रत्येक शाळेमध्ये भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबींचा विचार केलेला आहे.

यासाठी प्रत्येक शाळा ही किमान पहिली ते सातवीपर्यंत असणे गरजेचे आहे.या उपक्रमात निवड झालेल्या शाळेमध्ये स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,आकर्षक इमारती क्रीडांगण आयटीसी लॅब ,सायन्स लॅब,ग्रंथालय,सुशोभिकरण यासारख्या बाबी विकसित केल्या जाणार आहेत.

या पलीकडे शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिकवतील .वाशिंबे जिल्हा परिषद शाळेची या उपक्रमात निवड झाल्याबद्दल शिक्षकांचे ग्रामस्थ,सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीकडून अभिनंदन केले जात आहे.

litsbros

Comment here