करमाळा

वाशिंबेतील रेल्वे भूयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबेतील रेल्वे भूयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद

केतूर ( अभय माने) वाशिंबे (ता करमाळा) येथील वाशिंबे गोयेगाव रोड वरील ब्रीज क्रमांक ३२२/३ हा भूयारी मार्ग रेल्वे च्या दुहेरीकरनाच्या कामासाठी वार गुरुवार २६नोव्हेंबर सकाळी ६ पासून
वार शनिवार २८नोव्हेबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे रेल्वे विभागाने पत्रक प्रसिद्ध करुन सर्वाना कळविले आहे.

मोहोळ ते भिगवण या रेल्वे लाईन चे दुहेकरनाचे काम चालू आहे,त्या कामानिमित्त वाशिंबे येथील रेल्वेच्या भूयारी मार्गाचे काम चालू आहे, परंतु या मार्गाचे काम करत असताना प्रवासी वाहतूक काही दिवसांसाठी पूर्ण पणे बंद करावी लागत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

तरी सर्व परिसरातील नागरिकांनी ईतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

litsbros

Comment here