करमाळासोलापूर जिल्हा

वाशिंबेत उद्या नुतन खासदार मोहिते-पाटील यांचा गाव भेट दौरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबेत उद्या नुतन खासदार मोहिते-पाटील यांचा गाव भेट दौरा

वाशिंबे प्रतिनिधी :- माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.यात करमाळा तालुक्याने तब्बल ४१ हजाराचं मताधिक्य दिले.माजी आमदार नारायण पाटील यांचे मोठे योगदान आहे.तालुक्यातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहिते-पाटील हे दि.२० जून रोजी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

वाशिंबे येथे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ झोळ यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता संवाद मेळावात सकाळी ११ वाजता पंचकोशितील शेतकऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे.यावेळी माजी आमदार नारायण पाटील यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

litsbros