पुणेमहाराष्ट्रराज्य

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वक्ते जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचा इस्लामपुरात गौरव; लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पुणे(प्रतिनिधी); प्रेरणादायी व्याख्याते जगदीश अशोक ओहोळ लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले प्रेरणादायी पुस्तक ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकास सांगली जिल्ह्यातील आशीर्वाद सामाजिक संस्था इस्लामपूर यांच्यावतीने ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या एका भव्यदिव्य कार्यक्रमांमध्ये लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी युनायटेड नेशन तुर्की परिषदेचे भारताचे प्रतिनिधी अमन पटेल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सांगली जिल्हा सचिव नंदकुमार हात्तीकर, आशीर्वाद संस्थेचे संस्थापक विनोद बल्लाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील विविध प्रसंग प्रेरणादायी पद्धतीने लेखन केलेले पुस्तक आहे. लेखक जगदीश ओहोळ यांनी नव्या पिढीला, नव्या भाषेत प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे. या पुस्तकाच्या केवळ सात महिन्यात सोळा आवृत्या प्रकाशित झाल्या असून, त्यातील दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठांमध्ये विचारवंत डॉ. सुरज एंगडे यांचा हस्ते झाले आहे. विविध देशांमध्ये मराठी वाचकांमध्ये हे पुस्तक लोकप्रिय ठरले आहे, कमी कालावधीत म्हणजे सात महिन्यांमध्ये पुस्तकाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झालेने मराठी साहित्य विश्वात ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकांने नवा विक्रम केला आहे.

पुरस्कारा वेळी बोलताना आशीर्वाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद बल्लाळ म्हणाले की, ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकामुळे नव्या पिढीतील अनेक तरुण तरुणी वाचनाकडे पुन्हा आकर्षित झाले असून त्यांना आपले महामानव पुन्हा जाणून घेण्याची ओढ लागली आहे. या पुस्तकामुळे वाचन संस्कृती बळावली आहे, त्यामुळे हे पुस्तक या काळातील महत्वाचे पुस्तक ठरले असून वाचन संस्कृती वाढीस या पुस्तकामुळे मोठी मदत झाली आहे. त्यामुळे या पुस्तकाचा सन्मान करणे व त्यास अण्णाभाऊंच्या नावाचा ‘साहित्यरत्न’ हा पुरस्कार देणे, आम्हाला उचित वाटते.


तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नव्हे तर सर्वांचे, या देशाचे उद्धारक आणि जगाचे प्रेरणास्थान आहेत हे नव्या भाषेत जगदीश ओहोळ यांनी तरुणाई पुढे व जगापुढे मांडले आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचा गौरव करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे योग्य आहे व तो झालाच पाहिजे. हा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद वाटतो, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सांगली जिल्हा सचिव नंदकुमार हात्तीकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा – सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

आगळावेगळा वृक्षारोपण कार्यक्रम,दिग्गजांची उपस्थिती;दादाश्री फाउंडेशनचा उपक्रम

यावेळी आशीर्वाद बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनोद बल्लाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सांगली जिल्हा सचिव नंदकुमार हात्तीकर, युनायटेड नेशन तुर्की परिषदेचे भारताचे प्रतिनिधी अमन पटेल, संत रोहिदास चर्मकार समाज विकास संघटनेच्या अध्यक्षा श्रद्धाताई अतुल शिंदे, अनिकेत बनसोडे, सचिव धनाजी साफकर यांच्यासह अनेक मान्यवर , वाचक , सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

litsbros