उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

माढा प्रतिनिधी – माढा येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले.विद्यालयाच्या तब्बल 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.


यामध्ये 14 वर्षे मुलांच्या धावणे स्पर्धेत प्रेम कदम 200 मीटर द्वितीय,हरीष राऊत 600 मीटर प्रथम,सार्थक वाकडे 600 मीटर द्वितीय व 80 मीटर हर्डल्स तृतीय यांनी उज्वल यश संपादन केले.4×100 मीटर रिले स्पर्धेत 14 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात द्वितीय आला.यामध्ये सार्थक वाकडे,शंभू जाधव,सोहम मोरे,साईराज सोमासे व श्रवण राऊत यांनी यश संपादन केले.14 वर्षे मुलींच्या धावणे स्पर्धेत साक्षी थोरात 100 मीटर प्रथम व 200 मीटर प्रथम व 80 मीटर हर्डल्स द्वितीय,सानिका थोरात 200 मीटर द्वितीय,भक्ती निकम 400 मीटर प्रथम व 600 मीटर द्वितीय,स्वप्नाली देशमुख 600 मीटर प्रथम व 400 मीटर द्वितीय,श्वेता पवार गोळाफेक द्वितीय,कोमल क्षिरसागर गोळाफेक तृतीय यांनी उज्वल यश संपादन केले.4×100 मीटर रिले स्पर्धेत 14 वर्षे मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला.यामध्ये साक्षी थोरात,सानिका थोरात,भक्ती निकम,स्वप्नाली देशमुख व प्रतिक्षा भांगे यांनी यश संपादन केले.


17 वर्षे मुलांच्या वयोगटात निरंजन वाकडे 100 मीटर द्वितीय,200 मीटर द्वितीय व 110 मीटर हर्डल्स द्वितीय,संस्कार बेडगे 800 मीटर प्रथम,शिवरत्न कन्हेरे 800 मीटर तृतीय,अजय डुचाळ 110 मीटर हर्डल्स तृतीय यांनी यश मिळवले.4×400 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात प्रथम आला.यामध्ये संज्योतराजे कोळेकर,आदित्य हताळे,शिवरत्न कन्हेरे,समर्थ माळी व आदित्य सावंत यांनी उज्वल यश संपादन केले. तसेच 4×100 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलांचा संघ तालुक्यात तृतीय आला. यामध्ये निरंजन वाकडे,आदित्य हताळे, प्रमोद वाकडे,समर्थ माळी व अजय डुचाळ यांनी यश मिळविले.

17 वर्षे मुलींच्या धावणे स्पर्धेत साक्षी काळे 100 मीटर प्रथम,200 मीटर प्रथम व 100 मीटर अडथळा तृतीय, राजनंदिनी वागज 100 मीटर द्वितीय व 200 मीटर द्वितीय,काजल पवार 400 मीटर प्रथम,800 मीटर प्रथम व 100 मीटर अडथळा प्रथम,मैथिली थोरात 800 मीटर द्वितीय, साक्षी गोरे 400 मीटर द्वितीय,अपूर्वा शेटे 400 मीटर हर्डल्स द्वितीय यांनी उज्वल यश संपादन केले.

4×100 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला. यामध्ये राजनंदिनी वागज,साक्षी काळे,पूजा शितोळे,काजल पवार व मैथिली थोरात यांनी यश मिळविले.4×400 मीटर रिले स्पर्धेत 17 वर्षे मुलींचा संघ तालुक्यात प्रथम आला.यामध्ये साक्षी गोरे,मैथिली थोरात,अपूर्वा शेटे,काजल पवार व गौरी निकम यांनी उज्वल यश संपादन केले. उज्वल यश संपादन केल्याबद्दल वरील सर्व खेळाडूंचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री नरेंद्र पवार साहेब यांनी कौतुक केले.

हेही वाचा – विठ्ठलवाडीच्या दोघांचा एकाच वेळी मेडिकलला प्रवेश ही बाब कौतुकास्पद – अध्यक्ष रामचंद्र भांगे दोन वर्गमित्र विघ्नेश गव्हाणे व राजवर्धन गुंड यांचा सत्कार

केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये “आजची स्त्री-अबला नव्हे ,सबला” हा काव्य जागर कार्यक्रम संपन्न

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री शब्बीर तांबोळी सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे माढा तालुका क्रीडा समन्वयक श्री संजय शिंदे सर,माढा तालुका क्रीडा अधिकारी सौ.सुप्रिया गाडवे मॅडम,स्थानिक स्कूल कमिटी श्री सिताराम (बापू) गायकवाड,श्री कृष्णा (आप्पा) घाडगे,ॲड.श्री नानासाहेब शेंडे (वकिलसाहेब),विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब, विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व उपळाई बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

karmalamadhanews24: