महाराष्ट्रसांस्कृतिक

वाढदिवस विशेष- ‘शिवसेनेचा सेनापती; मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ; एका कट्टर शिवसैनिकाचा खास लेख

वाढदिवस विशेष :श्रीमान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
“विशेष लेख-शिवसेनेचा सेनापती, लेखक :शिवसैनिक शिवाजी कोलगुडे

शिवसेनेचा सेनापती:श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष ते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री हा प्रवास सहज शक्य झाला नाही. खुप खडतर प्रवास करून हा पल्ला साहेबानी गाठला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष होताच शिवसेना पक्षात फूट पडली. नारायण राणे, राजसाहेब ठाकरे, गणेश नाईक अश्या अनेक दिग्गज लोकांनी पक्ष सोडला. शिवसेना संपली अशा आरोळ्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या पण खचनार ते शिवसेना प्रमुखाचे पुञ कसले? पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्त्व करून महापालिकेत भगवा फडकवला आणि शिवसैनिकांचा विश्वास संपादन केला. नंतर हळुहळू राज्यातील निवडणुकीत नेतृत्त्व करून शिवसैनिकांना आपलेस करण्यात उद्धवजीना यश मिळाले.

त्यानंतरच्या काळात बाळासाहेबांच निधन झाल अवघा शिवसैनिक,शिवसेना पोरकी झाली. वेळ आली साहेबाच्या अग्नीपरीक्षेची.बाळासाहेब गेले शिवसेना संपणार अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं. उद्धवजीनी त्यात स्वतः ला, परिवारास, शिवसैनिकाला सावरल आणि सांगितले आता रडायचं नाही तर लडायच. पुन्हा उभे केले त्याच जोशानी पेटलेले शिवसैनिक. आता लढायच देव, देश आणि धर्मासाठी. त्या नंतर अनेक निवडणुकीत यश, अपयश उद्धवजीनी जवळुन पाहिले. 2014च्या निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना भाजप युती तुटली, त्या काळात देशात मोदी नावाची हवा, वावटळ होती. 25 वर्षाची मैञी समिकरण न जुळल्यामुळे संपुष्टात आली. पण उद्धवजीनी शांत, संयमी नेतृत्व करून स्व बळावर 63 आमदार निवडुन आनून मोदी लाटेचा अश्व रोखला. सत्तेसाठी लागणारा जादुई आकडा मिळु दिला नाही.

हेही वाचा- कारगिल विजयदिनाच्या दिवशी सोलापूरचा जवान जम्मू काश्मीर मध्ये शहीद

म्हणून त्या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर केला गोळीबार; धक्कादायक प्रकार

शेवटी दिल्लीतील नेत्याने युतीसाठी प्रयत्न केल्याने युतीस होकार देऊन महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली. मिळालेल्या खात्याचा वापर करून लोकांची सेवा केली. सरकार सोबत राहुन जेवढा विकास करायचा तेवढा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. सरकार जर चुकीचे निर्णय घेत आहे असे वाटत असेल तर त्या निर्णयाला उघडपणे विरोध करण्याचे धाडस दाखविले. सत्तेत सहभागी असून सुद्धा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात शिवसेनेने काटकसर सोडली नाही. शेतकरी कर्जबाजारी असल्याने शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला धारेवर धरण्याची धमक शिवसेनेनी दाखवली. सरकार मधे राहुन सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका शिवसेनेनी पार पाडली. त्या वेळेस जनता शिवसेनेला दुटप्पी म्हणायची.शिवसेनेच्या त्याच भूमिकेमुळे सरकार धारेवर यायचे.

राज्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी हवालदिल असताना उद्धवजीनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न चालू केले. शिवजलक्रांती योजना राबवली, शेतकर्‍यांच्या मुलींच्या लग्नासाठी प्रतेक जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाने कन्यादान योजना राबविण्यात आली त्यामध्ये हजारो मुलींचे लग्न करून दिले.संसार उपयोगी साहित्य शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. महाराष्ट्रातील काही दुष्काळी जिल्ह्यात शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी 10000रू ठराविक प्रती शेतकर्‍यांना मदत केली. आनी महाराष्ट्राला दाखवून दिले दुष्काळ गंभीर शिवसेना खंबीर. सरकार सोबत राहून जर जनतेचे कामे होत नसतील तर सरकारला धारेवर मी धरेल असे रोखठोक उद्धवजी बोलायचे.

पाच वर्षे प्रामाणिकपणे मिञपक्षाला सात देण्याचे काम उद्धवजीनी पार पाडले. सत्तेच्या नशेत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राममंदिर प्रश्नावर आवाज उठविला. पहले मंदिर फिर सरकार असे केंद्रात ठणकावले आणि वचननाम्याची आठवण करून दिली. राममंदिर प्रश्न सोडविण्यात शिवसेनेचा, उद्धवजीचा सिंहाचा वाटा आहे. केंद्रात प्रत्येक चांगल्या निर्णयास उद्धवजीनी पाठिंबा दिला.

2019च्या विधानसभा निवडणुकीत गाफिल राहायचे नाही असे सक्त आदेश साहेबानी शिवसैनिकाना दिले काही झाले तरी मला बाळासाहेबांना दिलेल वचन पूर्ण करायचे आहे, तुम्हा शिवसैनिकाचे स्वप्न साकार करायचे आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे असे काम करा असे फर्मान शिवसैनिकाना दिले. 2019ची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा जागावाटपाचा तिढा कायम राहिला.

नाही होय करत दिल्लीश्वेर मातोश्रीवर आले, जागावाटपाचा तिढा सुटला. जागावाटप जाहीर झाल्यानंतर युतीत निवडणूक लढविणार असल्याने काही नाराज उमेदवारांना शांत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या बंडखोरी टाळून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. प्रामाणिकपणे काम केले पण मिञानेच काही घाव केले हे आपण शिवसैनिकानी पाहिले आहे. नंतर निवडणुकीचे निकाल जाहीर झाले 56आमदार निवडुन आनून आपला राजकीय दबदबा कायम ठेवला हे शक्य झाले उद्धवजीच्या नियोजनबद्ध पद्धतीमुळे.सैनिकाच्या मेहनतीमुळे. ठरलेल्या शब्दाला मिञ मान्य न झाल्याने राजकीय विरोधकासोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. तिथेही आरोप शिवसेनेने हिंदुत्व सोडले. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. या सर्व प्रश्नांची उत्तरे शपथविधी सोहळ्याला भगवा पोशाख घालून चकमकीत उत्तर दिले.


मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि पहिल्याच बैठकीत स्वराज्याची राजधानी रायगड किल्लाला निधी उपलब्ध करून दिला. सरकार म्हणून जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले परंतु मधेच कोरोना सारखे जागतिक संकट महाराष्ट्रात, देशात आले. या परिस्थितीत लोकांना धीर, आधार दिला. समाजातील विविध घटकांची काळजी कुटुंब प्रमुखावनी घेतली.विरोधकाला सुद्धा आपलेसे वाटणारे साहेब खुप शांत, प्रेमळ, दिलदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावरफुल नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या या शांत, संयमी स्वभावाने अनेकांना घायाळ केले आहे. असो साहेबाबद्दल बोलन्याजोगे खुप आहे.

तूर्तास जय महाराष्ट्र.ll

शिवसैनिक कोलगुडे शिवाजी बीड ९१४६३७३७७७

litsbros

Comment here