अक्कलकोटकरमाळाकुर्डुवाडीपंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापुरच्या शेतकऱ्यांत बैठकीत राडा; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापुरच्या शेतकऱ्यांत बैठकीत राडा; वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणाचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सोलापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आज सिंचन भवनात बोलावलेल्या बैठकीतच जलसंपदा राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी भिडले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.

उजनीचं पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिंचन भवनात राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी बैठक बोलावली.

पण, या बैठकीत दत्ता भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाला.

सोलापूरच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बोलवून दत्ता भरणे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचं सांडपाणी वळवणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे सोलापूरचं पाणी पळवल्याच्या विरोधात शेतकरी सिंचन भवनावर मोठ्या संख्येने जमणार असल्याच्या घोषणेनंतर सिंचन भवनाला मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा- बेरोजगारीला त्रासून पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील परिवाराचा लोणी काळभोर येथे अंत

लॉकडाऊनमध्ये ही हिवरे गावात सुरु आहे दारू विक्री आणि जुगार; जुगारी, दारू विकणारे आणि पिणारे सर्वावर गुन्हे दाखल करा

दरम्यान, ‘शेवटचा तालुका असल्याने इंदापूर मधल्या नागरिकांवर अन्याय होतोय. इंदापूरसाठी घेतलेलं पाणी सोलापूरचं नाही, सोलापूरचा एक ठिपका ही कमी होणार नाही, असं सांगत जर सिद्ध करून दाखवलं की, मी सोलापूरचं पाणी इंदापूरला नेतोय,

तर मंत्रिपदच नाही तर आमदारकीचा ही राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन’, अशी भूमिका जलसंपदा राज्य मंत्री दत्ता भरणे यांनी घेतली आहे

litsbros

Comment here