करमाळासोलापूर जिल्हा

टेंभुर्णी येथे झाले केंद्र सरकार विरोधात आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

टेंभुर्णी येथे झाले केंद्र सरकार विरोधात आंदोलन

केम(प्रतिनिधी) ;
महाराष्ट्र राज्याचे नामदार बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री यांच्या आवाहानास प्रतिसाद देऊन रासायनिक खते दरवाढ व तुर,मुग, उडीद ही कडधान्ये विनाकारण केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात टेंभुर्णी तालुका माढा येथे प्रहार संघटनेच्या वतीने थाळी वाजवून व मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सोलापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या आंदोलनात प्रहार जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष संदिप तळेकर, करमाळा तालुका संपर्क प्रमुख सागर पवार तसेच सोनू मखरे, विजय पवार व इतर प्रहार सैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील म्हणाले की भारत देश हा शेतीप्रधान देश असून देशात 42 लाख टन तुरीची आवश्यकता असून 45 लाख टन तुर उपलब्ध आहे .

असे असताना केंद्र सरकारने 6 लाख टन तुरीची आयात कशासाठी केली असा संतप्त सवाल जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांनी केंद्र सरकारला केला. तसेच तुर,उडीद, मुग आयात पूर्णपणे खुली करून धान्याचे भाव पाडण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे असेही दत्ता भाऊ मस्के पाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की ज्यावेळी देशावर कोरोना संकट आले होते तेव्हा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला थाळी वाजवून कोरोना जातो व संकट दूर होतं.

हेही वाचा-गावागावातल्या बचत गट वाल्यांनो लक्ष द्या, लॉकडाऊन संपेपर्यंत ‘हे’ करू नका; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीस जामीन

त्याचपद्धतीने आम्ही आमचे नेते बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री यांच्या आवाहानास प्रतिसाद देऊन थाळी वाजवून देशातील शेतकरयांच रासायनिक खते दरवाढ मुळे होणारी लूटीच संकट दूर करण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रहार संघटनेच्या वतीने थाळी वाजवून आंदोलन केले आहे.

litsbros

Comment here