ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.१२ वी साठी सुमारे २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.१२ वी साठी सुमारे २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय

कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.१२ वी साठी सुमारे २५% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली. पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे.

२०२० आणि २१ हे शैक्षणिक वर्ष सुरू केलं आहे. ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरू केलं आहे. प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात तणाव वाढू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय  घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.

म्हणून त्या विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर केला गोळीबार; धक्कादायक प्रकार

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

litsbros

Comment here