करमाळामाढासोलापूर जिल्हा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मनमोहक तिरंगा रोषणाईने उजळले उजनी धरण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मनमोहक तिरंगा रोषणाईने उजळले उजनी धरण

केत्तूर (अभय माने) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 12 ऑगस्ट पासून उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगी झेंड्याच्या तीन रंगात उजनीतून भीमा नदी पात्रात होत असलेल्या विसर्गाच्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

ही नेत्रदीपक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्यांची पावले क्षणभर उजनी धरणा जवळून जाणाऱ्या पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थबकत असून, ही विहमंग व प्रेरणादायी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी सायंकाळच्या सुमारास उजनी धरणाच्या क्षेत्रामध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे .

मागील वर्षी धरण केवळ साठ टक्केच भरले होते त्या पाण्यातूनच गतवर्षीच्या आवर्षण काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये उजनी धरणाचा वापर होऊन उणे साठ टक्के इतकी निचांकी पाण्याची पातळी धरण्याने गाठलेली होती.

हेही वाचा – जिल्हा नियोजन समितीवर निवड होताच पहील्याच बैठकीत दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या ‘या’ प्रश्नावर उठवला आवाज

यशकल्याणीच्या व्यासपीठावर जागतिक किर्तीचे वक्ते निर्माण होतील – प्रा. गणेश करे-पाटील.

त्यामुळे यावर्षी पावसाळा सुरू होऊन काही विलंबाने का होईना पण उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवरच उजनी धरण व्यवस्थापन समितीने उजनीच्या उसळत्या पाण्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीची विद्युत रोषणाई केली आहे. हे अप्रतिम दृश्य पाहण्यासाठी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी होत आहे.

litsbros