महाराष्ट्रशैक्षणिक

डिजिटल युग आणि शिक्षण विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी चर्चासत्र

डिजिटल युग आणि शिक्षण विषयावर
विद्यापीठातर्फे शुक्रवारी चर्चासत्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलामार्फत येत्या शुक्रवारी, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ‘डिजिटल युग आणि शिक्षण’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मायक्रोसॉफ्ट कंपनीचे पार्टनर प्रॉडक्ट मॅनेजर प्रवीण इंदुरकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे यावेळी मुख्य भाषण होईल. त्याचबरोबर यावेळी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या प्रिन्सिपॉल प्रोग्राम मॅनेजर प्रेरणा नाईक यांचेही मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये प्र-कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा, आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांचाही सहभाग राहणार आहे.

कोरोना आणि लॉकडॉनमुळे देश आणि विदेशातील सर्व क्षेत्रात फार मोठे बदल झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातही नव्या बदलाची नांदी सुरू झाली आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केले आहे.


त्यापार्श्वभूमीवर डिजिटल युग आणि शिक्षण या विषयावर सविस्तर विचारमंथन होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी सांगितले. या चर्चासत्राचा विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

litsbros

Comment here