शैक्षणिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रा.डॉ.तब्बसुम मुजावर यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. तब्बसुम मुजावर यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील पदार्थविज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. तब्बसुम मुजावर यांना नुकताच उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान या काळात ट्रीची, तामिळनाडू येथे अभियांत्रिकी, विज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र या विषयावर आयोजित केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय संशोधक पुरस्कार परिषदेत डॉ.तब्बसुम मुजावर  यांचा बहुमान प्रदान करण्यात आला.

डॉ. तब्बसुम मुजावर यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी सोलापूर  विद्यापीठातून 2016साली पीएचडी पदवी संपादन केली त्या इलेक्ट्रॉनिक्स विषयातून सेट व नेट उत्तीर्ण आहेत. त्यांच्या नावे 40 आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित असून 21 राष्ट्रीय संशोधन पेपर प्रकाशित आहेत. त्यांची 2 पुस्तके जर्मनी येथे प्रकाशीत झालेली आहेत.

2018 मधील   नोबेल पुरस्कार विजेते गरार्ड मोरऊ, लंडन यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये दोन प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत. यात 22 हून जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे .सेट-नेट कार्यशाळांना मार्गदर्शन, कमी वयात तज्ञ मार्गदर्शन म्हणून बहुमान मिळविला.

डाॅ. तब्बसुम मुजावर यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर  मध्ये पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे मेरिट स्काॅलरशिप व स्वर्गीय. शांतराम नारायण वैंगणकर पारीतोषिक प्राप्त झाला. शिवाजी विद्यापीठात त्या रँकर होत्या. विद्यार्थी प्रतीनिधी म्हणून काम पाहिले.

तामिळनाडू येथे (2013) साली व सोलापूर विद्यापिठा मध्ये भूशास्ञ संकुलामध्ये (2017)साली भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय परीषेदेत त्यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.

प्रा.डाॅ. तब्बसुम मुजावर यांना प्रा.डाॅ.एल.पी.देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील एका शेतकरी कुंटुंबातून आलेल्या डाॅ. तब्बसुम मुजावर यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

litsbros

Comment here