सांस्कृतिकसोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

एम. के. फाऊंडेशन सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी विजयादशमीनिमित्त एम.के फाऊंडेशनची स्थापना 

एम. के. फाऊंडेशन सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

विजयादशमीनिमित्त एम.के फाऊंडेशनची स्थापना 

सोलापूर:मातृपितृ सेवेतून आपण ज्याप्रमाणे कधीही मुक्त होत नाही त्याचप्रमाणे सामाजिक व देशसेवेतूनही आपण मुक्त होत नाही. सामाजिक, धार्मिक सेवा या शेवटी ईशसेवेस समर्पित होतात. अगदी याच प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी महादेव कोगनुरे यांनी विजयदाशीमीच्या शुभ मुहूर्तावर एम. के. फाऊंडेशनची स्थापना केली. येत्या काळात एम.के. फाऊंडेशन नाविन्यपूर्ण योजना, कार्यक्रम राबवून सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार असा विश्वास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी व्यक्त केला. 

   विजयदाशीमीच्या शुभ मुहूर्तावर खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते  एम. के.फाऊंडेशनचा स्थापना शुभारंभ कार्यक्रम शिवयोगी धाम, शेळगी येथे पार पडला. याप्रसंगी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी बोलत होते. एम.के फाऊंडेशनच्या लोगो चे अनावरण करून मोठ्या मंगलमय वातावरणात संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला.  

     पांडवांनी कौरवांवर विजय मिळविल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी. या अत्यंत शुभ प्रसंगी  सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी एम. के. फाऊंडेशनची स्थापना करण्याचा संकल्प केला. हा संकल्प आता पूर्ण होत असून यापुढे त्यांच्या हातून अनेक सामाजिक उपक्रमातून समाजसेवा, धर्मसेवा, देशसेवा घडणार आहे. अत्यंत संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवन जगत असल्याने समाजाप्रती काम करण्याची जिद्द श्री कोगनुरे यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे.

आता एम.के फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात भरीव योगदान देणार असा विश्वास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी व्यक्त केला.         तसेच, आजपर्यंत सामाजिक बांधिलकीतून अनेक कामे केली. गोरगरिबांना सहायय केले. पण संघटनात्मक रूपाने आणखी मोठे कार्य माझ्या हातून घडावे यासाठी एम.के फाऊंडेशनची सुरुवात करण्याचा निर्धार केला होता.

हेही वाचा- माळशिरसच्या तरुण दिग्दर्शकाची आंतरराष्ट्रीय झेप; ‘नागास्टाइल’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची संधी;दहावी-बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

या शुभदिनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या शुभहस्ते संस्थेच्या कार्यास प्रारंभ झाला हा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक कामांसाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमातून सामाजिक कार्य करणार आहे.

लोकाभिमुख कामातून देशसेवा करण्यासाठी माझी संस्था सातत्याने कार्यरत असणार असे मनोगत एम.के. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. 

   यावेळी, एम. के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, शिवयोग धाम सेवा समितीचे अध्यक्ष राजशेखर हत्ती, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, उद्योजक आनंद लुणावत, सोमनाथ होसाळे, निळकंठय्या स्वामी, राजशेखर रोडगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – पक्षी निरीक्षणासाठी जगभर भ्रमंती करणारे डॉक्टर; हजारो पक्ष्यांची छबी कॅमेरात केली कैद भारतातील ६५ टक्के परिसर काढला पिंजून

याप्रसंगी संस्थेच्या शुभारंभ प्रसंगी उद्योजक आनंद लोणावत यांनी संस्थेला 51 हजारांची देणगी दिली. तसेच सोमनाथ होसाळे यांनी 11 हजारांची देणगी दिली. यापुढेही संस्थेच्या कामात योगदान देत सामाजिक कामे करण्यासाठी सक्रिय सहभागी असण्याचे उद्योजक आनंद लोणावत व सोमनाथ होसाळे यांनी सांगितले.

litsbros

Comment here