आरोग्यशेती - व्यापारसोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मा. मुख्यमंत्री महोदयांना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील ‘या’ समस्या सोडविण्यासंदर्भात दिले मागण्यांचे निवेदन

मा. मुख्यमंत्री महोदयांना आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील ‘या’ समस्या सोडविण्यासंदर्भात दिले मागण्यांचे निवेदन.

सोलापूर: महाराष्ट्रात सुमारे 5 लाख विडी कामगार आहेत व सोलापूर शहरातील प्रमुख उद्योगापौकी विडी उत्पादनाचा उद्योग हा एक मोठा उद्योग असुन 17 प्रमुख विडी उत्पादन कारखान्यांच्या 145 ब्रँचेस आहेत. सदर उद्योगामध्ये सुमारे 70 हजार स्त्री, पुरुष कामगार, कर्मचारी काम करतात. त्यापौकी मुख्यत्वे सुमारे 60 हजार महिला ह्या विडी वळण्याचे काम करतात. त्यांना कारखान्यातून तेंदू पत्ता, तंबाखू, दोरा इत्यादी कच्चा माल दिला जातो व सदर महिला कामगार हा कच्चा माल घरी घेवून जावून विडया वळतात व वळलेल्या विडयाचे माप कारखान्यात आणून देतात.

त्यामुळे त्यांना घरखेप महिला विडी कामगार असे संबोधिले जाते. सदर महिला कामगार हे घरात विडया वळत असल्यामुळे त्यांना E.S.I. या योजनाचा लाभ मिळत नाही. दर हजार विडीवर मिळणारया अतिशय कमी वेतनावर त्यांचे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विडी कामगारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे शारिरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक व शेक्षणिक दृष्टया पिळवणूक होत आहे. सदर महिला विडी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणेकामी, त्यांचे जीवनमान उंचावणे कामी व त्यांच्या पाल्यांना शेक्षणिक सुविधांचे लाभ मिळण्याकामी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याबाबतच्या मोफत विविध सुविधा मिळणेकामी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची व त्यामार्फत त्यांना प्रामुख्याने खालील बाबींचा लाभ मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे.

1) महिला विडी कामगार व त्यांचे कुटुंबियांना आरोग्याच्या व गंभीर स्वरुपाच्या आजाराकरीता स्वतंत्र निधी मिळावा. उदा. टी.बी. (क्षयरोग), कॅन्सर, ह्रदयविकार, मेंदुविकार, किडनी विकार, जळीतग्रस्त, अपघातग्रस्त व इतर गंभीर स्वरुपाचे आजारावर तसेच नैसर्गिक व शस्त्रक्रियेव्दारे होणारया प्रसुतीकामी मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया सुविधा मिळावा.
2) विडी कामगाराकरीता स्वतंत्र अद्यावत व सुसज्ज अशी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना करण्यात यावी.
3) विडी कामगारांच्या पाल्यांना मोफत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पद्वीका व पदवीत्तर शिक्षण, शिक्षण साहित्य व सर्व प्रकारचे शेक्षणिक सुविधा मोफत मिळावा तसेच त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या; मा.आ.नारायण पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संकटावर मात करत करमाळयाच्या सुपुत्राने घेतली सुवर्ण झेप; पांगऱ्याच्या दिव्यांग सुयशची प्रेरणदायी यशोगाथा; नक्की वाचा

4) महिला कामगारांच्या मुला, मुलींना उच्च, तंत्र, वैद्यकीय व व्यवसायिक शिक्षणात प्रवेशाकरीता विशिष्ठ प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात याव्यात तसेच या शिक्षणाकरीता त्यांना विशेष शेक्षणिक निधीचा लाभ मिळावा व शिष्यवृत्ती देण्यात यावा.
5) विडी कामगारांचा अपघाती मृत्यु झाल्यास अथवा त्यांना अपंगत्व आल्यास संबंधित कामगारावर आधारीत संपूर्ण कुटुंब सदस्यांच्या उदरनिर्वाहाकरीता योग्य ती पुरेशी निधी त्यांना मिळावा.
6) विडी कामगारांच्या कुटुंबियास राहण्याकरीता शासनाच्या वतीने मोफत घरे देण्यात यावीत.
7) ज्येष्ठ महिला विडी कामगारांना सन्मानधनाची तरतुद करण्यात यावी.
8) निवृत्त महिला कामगारांना दरमहा रु.10,000/- निवृत्ती वेतनाची तरतुद करण्यात यावी इत्यादी.

विविध सुविधांकरीता व महिला विडी कामगारांच्या सर्वकष कल्याणार्थ विडी कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबविण्यात यावे. या सर्व समस्यांचे निवारण होण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब यांना निवेदनाव्दारे मागणी केली.

litsbros

Comment here