क्राइममहाराष्ट्रसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी तरुणाने केली ‘ही’ आयडिया; चाणाक्ष सोलापूर पोलिसांनी मात्र पकडलेच

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी तरुणाने केली ‘ही’ आयडिया; चाणाक्ष सोलापूर पोलिसांनी मात्र पकडलेच

सोलापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलीस दलातील 2019 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. राज्यातील विविध जिल्हा पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालय यांच्याकडील पोलीस भरती कोरोना विषाणू संसर्गामुळं भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी असा ओळखला बनाव –

पोलीस भरतीत उंची वाढविण्यासाठी तरुणाने भलतीचं शक्कल लढवली. मात्र, पोलिसांनी त्याचा बनाव ओळखला. संबंधित उमेदावर विग लावून पोलीस भरती मध्ये उतरला होता. प्रभुराम प्रकाश गुरव असं या उमेदावाराचं नाव आहे.

हेही वाचा- मागासवर्गीय सरपंचाला चपलेचा हार; करमाळा तहसील समोर निदर्शने

जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

88 पदांसाठी भरती प्रक्रिया

सोलापूर जिल्हा मुख्यालयाकडून 2019 मध्ये काढण्यात आलेल्या 88 पोलीस शिपाई पदाकरीता भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. शहर मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभूरामाची उंची 163.5 होती. भरती होण्यासाठी 165 सेंटिमीटर उंचीची अट आहे. दीड सेंटीमीटर उंची वाढवण्यासाठी विग लावला होता.

litsbros

Comment here