अक्कलकोटआरोग्यकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लॉकडाऊनने कंबरडे मोडले, सोलापूर जिल्ह्यातील दुकाने उघडणेबाबत ‘या’ माजी आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लॉकडाऊनने कंबरडे मोडले, सोलापूर जिल्ह्यातील दुकाने उघडणेबाबत ‘या’ माजी आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा

बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील विविध विषयासह अत्यावश्यक सह इतर आवश्यक दुकाने उघडण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी माजी मंत्री दिलीप सोपल यांची प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती शिवसेना नेते दिलीप सोपल यांनी दिली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे ,म्हाहौसिंग चे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे ,विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, डिसिसी माजी संचालक अरुण कापसे उपस्थित होते .

सोपल यावेळी म्हणाले ,प्रदीर्घ लॉकडाऊन ने सर्वांचे कंबरडे मोडले आहे . प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अनेकांना आर्थिक आणि त्या बरोबर मानसिक नुकसानी ला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सोबत आवश्यक दुकाने देखील नियम घालून उघडण्यात यावीत . व्यापारी व त्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून अनेकांच्या सहनशीलता संपलेल्या आहेत. सुदैवाने बार्शीचा कोरोना टक्केवारी आलेख खालावत आहे.

मिरगणे यावेळी म्हणाले की , स्थानिक पातळीवर कोरोना काळात प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून पक्षपाती कारवाया होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी आदेशीत करण्यात यावे. अक्कलकोटे यांनी यावेळी लसीकरण चा वेग वाढवणे अधिक केंद्र सुरू करणे तपासणी किट जास्तीचे देणे आदी मुद्दे उपस्थित केले .

यावेळी शासनाने 3 तासात 2 कोटी ऑक्सिजन प्लांट साठी देऊनही नगरपालिका प्लांट उभा करण्यात दिरंगाई करत असल्याचही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासह शासकीय गोदामतील थकीत हमाली, विविध मुद्द्यावर चर्चा झाली.

हेही वाचा- कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्त्व स्वीकारण्यास शासन खंबीर; मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती, त्या मुलांच्या नावे सरकार ठेवणार ‘इतक्या’ लाखांची ठेव

करमाळा तालुक्यातील रावगावकर युवकांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची बदलत आहे पद्धत; सर्वत्र होतेय चर्चा

करमाळा पोलीसांची धडाकेबाज कारवाई; 23 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी यासर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत इतर दुकानाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे धोरण असुन तसा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

litsbros

Comment here