सोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूरची लेकी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये; कार्यक्रम पाहण्यासाठी आमदारांनी गल्लीत लावली LED स्क्रीन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूरची लेकी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये; कार्यक्रम पाहण्यासाठी आमदारांनी गल्लीत लावली LED स्क्रीन

सोलापूर : सोलापूर शहरातील लोधी गल्ली येथे कु. नंदिनी लक्ष्मण मदनावाले राहत असून त्यांची आई नर्स व वडील समाजसेवक आहे. कु. मदनावाले ही सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची अभिताभ बच्चन संचलित कौन बनेगा करोडपती (KBC) या रियलिटी शो मध्ये निवड झालेली होती.

त्यांनी या शो मध्ये यश प्राप्त करून सदर मालिकेमध्ये 6 लाख 40 हजार रुपये जिंकले. कु. मदनावाले ही सोलापूरातील पहिली व्यक्ती असून त्यांनी सोलापूरचे नांव देशभरात प्रसिध्द केले आहे.

याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने लोधी गल्ली येथे LED स्क्रीन लावून कु. नंदीनी मदनावाले यांचा कौन बनेगा करोडपतीचा एपिसोड दाखविण्यात आले.

हेही वाचा; करमाळा ते कोर्टी या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

गावाने केली ‘ही’ एक युक्ती आणि गावात बिबट्या यायचा कायमचं बंद झालं!

तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी कु. नंदिनी मदनावाले यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी लोधी समाजातील मान्यवर व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

litsbros

Comment here