सोलापूरसोलापूर जिल्हा

लॉकडाऊन मध्ये पैसे घेऊन गाड्या सोडणारे 4 पोलिस तडकाफडकी निलंबित; अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची कारवाई

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लॉकडाऊन मध्ये पैसे घेऊन गाड्या सोडणारे 4 पोलिस तडकाफडकी निलंबित; अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची कारवाई

सोलापूर: सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा तसेच परराज्यातील वाहनचालकांकडून भीमानगर
नाकाबंदी पॉईटवर पैसे घेऊन सोडले जात
असल्याच्या तक्रारी येत होत्या. लॉकडाऊनमध्ये

नाकाबंदीत वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना
सोडून देणाऱ्या पोलिसांना पोलीस अधीक्षक तेजस्वी
सातपुते यांनी निलंबित केले आहे.

अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी
एका महिलेसह ४ पोलिसांना निलंबित केले आहे.
हेडकाँस्टेबल रमेश सूरनार, पोलीस काँस्टेबल निखिल
पवार, प्रवीण शिंपाळे व प्रियंका आखाडे अशी
निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

हेही वाचा-करमाळा महसूल विभागाची मोठी कारवाई; साडेतीन लाखाची वाळू जप्त

हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने करमाळयात गरजु नागरिकांना धान्य कीट वाटप

सोलापूर जिल्ह्यात राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर
२८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तेथे
वाहनांची कागदपत्रे तपासून सोडली जातात.परंतू नाकाबंदी ठिकाणी पैसे घेऊन वाहाने सोडली जात होती.
याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर
पोलीस अधीक्षकांना त्याचा अहवाल प्राप्त होताच
त्यांनी पैसे घेणाऱ्या चार पोलिसांना निलंबित केले.

litsbros

Comment here