अक्कलकोटकरमाळापंढरपूरपंढरपूरबार्शीमंगळवेढामहाराष्ट्रमाळशिरसराजकारणसांगोलासोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्यात पदवीधर ६२.०७ तर शिक्षक मतदार संघ ८५.०९ टक्के मतदान; वाचा कोणत्या तालुक्यात किती झाले मतदान.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यात पदवीधर ६२.०७ तर शिक्षक मतदार संघ ८५.०९ टक्के मतदान

सोलापूर (१ डिसेंबर) – पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकसाठी आज सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले असून पदवीधर ६२.०७ तर शिक्षक मतदार संघ ८५.०९ टक्के मतदान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण १२३ मतदान केंद्रे हे पदवीधरांसाठी असून यात पुरुष पदवीधर मतदार ४२०७० तर स्त्री पदवीधर मतदार ११७४२, इतर (TG) पदवीधर मतदार १ एकूण पदवीधर मतदार ५३८१३ इतके असून २७१७० पुरुषांनी तर ६२२९ स्त्री मतदारांनी मिळून एकूण – ३३३९९ मतदारांनी मतदान केले आहे. या मतदानाची एकूण टक्केवारी – ६२.०७% इतकी आहे.

तसेच शिक्षक मतदारसंघात एकूण ७४ मतदान केंद्रे असून पुरुष शिक्षक मतदार १०५६१, स्त्री शिक्षक मतदार – ३०२३, एकूण शिक्षक मतदार – १३५८४ मतदार असून त्यापैकी झालेले मतदान पुरुष – ९२२५, स्त्री – २३७१ एकूण मतदान – ११५५८ झाले असून या मतदानाची टक्केवारी ८५.०९% इतकी आहे.

पहा तालुकानिहाय मतदान

litsbros

Comment here