अक्कलकोटपंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसह झाल्या बदल्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीसह झाल्या बदल्या

महाराष्ट्रातील ९६ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्‍त पदावर पदोन्नती देण्यात येऊन बदल्या करण्यात आल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले.

यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार अधिकार्याचा समावेश आहे. सोलापूर शहर आयुक्‍तालयातील पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची पदोन्नतीने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या उपअधिक्षक (मुख्यालय) पदी बदली करण्यात आली आहे.

तसेच सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक अरूण सावंत यांची अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर अधिक्षकपदी,

हेही वाचा- हा बिबट्या नरभक्षक झाल्यावर गोळ्या घालण्यापेक्षा आताच जिवंत पकडा! भयभीत नागरिकांची आर्त हाक.. वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

दुःखद बातमी; पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कुर्डुवाडीत हळहळ

तर प्रदीप जाधव यांची उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव कॅम्प (नाशिक ग्रामीण) येथे आणि विश्‍वंभर गोल्डे यांची औरंगाबाद शहर सहायक पोलिस आयुक्‍तपदी बदली.

तसेच केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक हारूण मुलाणी यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीजच्या उपअधिक्षकपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.

litsbros

Comment here