बार्शीमनोरंजनसोलापूर जिल्हा

तृप्ती देसाईं सोबतच बार्शीच्या ‘या’ सुप्रसिद्ध मराठी कीर्तनकार ही दिसणार मराठी बिग बॉसच्या घरात!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तृप्ती देसाईं सोबतच बार्शीच्या ‘या’ सुप्रसिद्ध मराठी कीर्तनकार ही दिसणार मराठी बिग बॉसच्या घरात!

बार्शीच्या शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी ७ वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील देखील यंदाच्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे.

तरुण कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील या खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला पाटील यांची कीर्तन पाहिली जातात.

हेही वाचा- मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात; आरोग्य तपासणी करून डांबला तुरुंगात

आवाटी येथे अवैध वाळू उपसा सुरूच; नदीकाठची शेती धोक्यात; प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे जोमात

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत. कीर्तन या पुरुषप्रधान क्षेत्रात शिवलीला पाटील यांचं नाव प्रसिद्ध आहे. अनोख्या विनोदी शैलीत त्या कीर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर खूप चर्चा होते.

शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच त्यांना कीर्तनाचं बाळकडू मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली आहेत.

litsbros

Comment here