आरोग्यसोलापूर शहर

संचारबंदी यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक नगरसेवकांनी नागरिकांशी संवाद साधावा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन

संचारबंदी यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

नगरसेवकांनी नागरिकांशी संवाद साधावा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन

सोलापूर (१४ जुलै) – सोलापूर शहरातील संचारबंदी यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात नागरिकांशी संवाद साधुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले. सोलापूर शहर आणि नजिकच्या गावांत १६ जुलैपासून पूर्णसंचारबंदी जाहिर केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्या उपस्थित १३ ते २६ प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांची नियोजन भवन येथे बैठक झाली.


शंभरकर म्हणाले, लॉकडॉऊनच्या काळात नागरिकांना सोयी-सुविधा पुरवण्यासंबंधी प्रभाग समितीमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र केवळ प्रशासन ही साखळी तोडू शकत नाही त्यासाठी नागरिकांची साथ आवश्यक आहे.

मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका अनेक आघाड्यावर प्रयत्न करीत आहे. कोरोना रिपोर्ट वेळेत मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. लॉकडाऊनबाबतचा सविस्तर आदेश लवकरच जाहिर केला जाईल.

हेही वाचा- आज मंगळवारी करमाळयाचा नवा रुग्ण नाही; त्या महिलेशी संबंधित १५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले- डॉ.डुकरे

करमाळा ब्रेकिंग; करमाळा शहर लॉकडाऊन करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरपरिषदेची मागणी

जेष्ठ नागरिकांना काही त्रास होत असेल तर त्यांनी लगेच महापालिकेला कळवावे किंवा जवळच्या आरोग्य केंद्र येथे तपासणी करून घ्यावी जेणेकरून पुढील उपचार लवकर करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रातील कोम आॕरबीड म्हणजे ज्यांचे वय जास्त आहे व रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) सह आणखी काही आजार असतील अशा व्यक्तींची रॕपीड अँटीजेनीक टेस्ट या लॉकडाऊन काळात घेण्याचे नियोजन असल्याचे देखील सांगण्यात आले.

ही सुविधा पालिकेच्या दवाखान्यांसोबतच मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून ज्या-त्या परिसरात देण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी नगरसेवकांनी सहकार्य करावे. लॉकडाऊनसाठी शहर पोलिसांनी अतिशय काटेकोर नियोजन केले आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्यात येत आहे, असे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले.

बैठकीस उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक बाबा मिस्त्री, गुरुशांत धुत्तरगांवकर, रियाज खरादी, विनोद भोसले, वैभव हत्तुरे, उमेश गायकवाड, प्रवीण निकाळजे, भारतसिंग बडुरवाले, रियाज हुंडेकरी, शशिकांत केंची, श्रीनिवास रिकमल्ले, संतोष भोसले, श्रीनिवास पुरुड, नगरसेविका फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, मिनाक्षी कंपली, श्रीदेवी फुलारे, प्रतिभा मुदगल, वहिदाबानो शेख आदी उपस्थित होते.

#ThinkSolapur

litsbros

Comment here