आरोग्यसोलापूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापुरात कोरोना रुग्णांचे जास्तीचे आकारलेले बील ‘असे’ मिळाले परत

सोलापुरात कोरोना रुग्णांचे जास्तीचे आकारलेले बील ‘असे’ मिळाले परत

सोलापूर – कोरोना रुग्णांच्या हॉस्पिटल बिलामध्ये आकारलेले जास्तीचे तब्बल पाच लाख रुपये ४३ रुग्णांना आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते धनादेशद्वारे परत देण्यात आले.महानगरपालिका अंतर्गत कोविड –१९ कंट्रोल रूमचे कामकाज चालते. कंट्रोल रूम मार्फत नर्मदा हॉस्पिटल मधील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे बिलांचे लेखा परीक्षण करण्या करिता लेखाधिकारी म्हणून नेमणूक केलेले आहेत.

धनराज पांडे, उपायुक्त व सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा परीक्षक सर्फराज मोमीन, झिन्जुरे व विष्णु गाडे यांनी बिलांचे लेखा परीक्षण केले असता एकूण ४३ रुग्णांचे ५,००,५४०/ – इतकी रक्कम तफावत आढळून आले. ज्यादा रक्कम आकारणी केलेल्या बिलांचे रुग्णास परत करण्याकरिता आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावले व तात्काळ रुग्णास परत करण्यास सांगितले. त्यानुसार नर्मदा हॉस्पिटलनेवरील ४३ रुग्णांचे चेक व यादी कोविड कंट्रोल रूमला सादर केले. महापौर श्रीकांचना यन्नम व उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते सर्व रुग्णास धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी महापौर यन्नम म्हणाले की, कोविड कंट्रोल रूमचे कामकाज कौतुकास्पद असून लेखाधिकारी यांनी अतिशय चांगले लेखा परीक्षण करून रुग्णांचे जादा झालेले बिल परत करून रुग्णांना दिलासा दिलेला आहे. तसेच कोणत्याही हॉस्पिटलने जर जास्त बिल आकारले असेल तर त्यावर कारवाई केली जाईल.

हेही वाचा – घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही;संपूर्ण संकट टळल्यावर पंचनामा करून मदत करणार:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने केला १९ लाखांचा अपहार;पोलिसांनी केली गोव्यातून अटक

उपायुक्त पांडे म्हणाले कि, वित्त विभागातील लेखा परीक्षक रुग्णांचे बिल तपासणीसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नेमून महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केले व जर कोणत्याही रुग्णाचे तक्रार असेल तर त्यांनी कोविड कंट्रोल रूमला अर्ज करावे व प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळावे.
यावेळी सर्फराज मोमीन, आश्विन झिन्जुरे, विष्णू गाडे, तांत्रिक तज्ञ चंद्रकांत मुळे, उज्वला गणेश, सिद्धाराम मेंडगुदले, विनायक मोटे, समीर शेख व सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

litsbros

Comment here