अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांला यश

सोलापूर : आज दि. 17 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर व संबंधितांची बैठक आयोजित केली होती.

संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारने राज्यामध्ये कडक निर्बंध लागू केले आहे. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. परंतू सध्याच्या लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे.

हेही वाचा- रावगाव येथे झालेल्या विज वितरण कंत्राटी कामगाराच्या मृत्यु प्रकरणी ‘या’ तिघाजणाविरूध्द करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा तालुक्यातील अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींना पकडण्याचा धडाका सुरूच: आज एकाला सापळा रचून अटक; नवनियुक्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची मोहीम

सदर महिलांनी त्यांचे दैनंदिन जीवन, उपजीवीका व विविध कारणास्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रोफायनान्सकडून कर्ज घेतले आहेत. या कर्जांची परतफेड कशी करायची व आपले दैनंदिन जीवन, उपजिवीका कशी चालवायची असा प्रश्न महिलांसमोर उभा आहे.

सदर महिलांना मायक्रोफायनान्स कंपनीकडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवून कामगार महिलांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सवलत मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी संबंधितांची बैठक आयोजित केली होती.

सदर बैठकीमध्ये लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांच्या वसुलीवर बंदी घालण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे.

litsbros

Comment here