शिक्षकाने आपल्या शिक्षक पत्नीची डोक्यात वरवंटा घालून केली निघृण हत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर,दि.१५ :सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जुळे सोलापुरातील चंदननगरजवळील नीता रेसिडेन्सीमध्ये शिक्षकाने आपल्या शिक्षक पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. आर्थिक कारणावरुन अडचणीत आलेल्या पतीने पत्नीला संपवून त्याने स्वतः आत्महत्येच्या प्रयत्नाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली सविस्तर माहीती अशी की, अर्चना विकास हरवाळकर ( वय ३२, रा. नीता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर )असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विकास विश्वनाथ हरवाळकर ( वय ३७ ) याच्याविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना व तिचा पती विकास हे
दोघे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे . सोमवारी सकाळी विकासने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला . त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावली.

त्यावेळी मुलगा हा घरात झोपला होता.त्यानंतर विकासने आपल्या मोबाइलच्या व्हॉट्सअॅपवर सॉरी, मी आपल्या विश्वासास पात्र ठरलो नाही, या आशयाचा स्टेटस ठेवला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन तसेच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.विकासचा व्हॉटस्अॅप स्टेटस पाहून संशय आल्याने त्याचा नवीन आरटीओ कार्यालयाजवळील आदित्यनगर येथील नातेवाईक प्रणय कांबळे हा त्यांच्या घरी पोहोचला.
हेही वाचा – बिटरगाव-ढोकरी परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा; उपसरपंच देशमुख
आदिनाथ कारखान्यातील ‘हे’ व्यवहार 15 दिवसाच्या आत मिटवा अन्यथा ‘रक्त सांडो’ आंदोलन करणार
त्यावेळी स्वतःही त्यांचे घर आतून बंद होते. त्याने घराची बेल वाजवली ,दरवाजा ठोठावला , परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी त्यांच्या शेजारचे लोक गोळा झाले. प्रणयने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा विकास दृष्टीस पडला. त्याच्या टीशर्टवर रक्ताचे डाग दिसून आले. त्याची पत्नी जमिनीवर पडलेली दिसून आली. फरशीवर रक्त पसरलेले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहायक आयुक्त प्रीती टिपरे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ व डीबी पथकाने धाव घेतली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
Comment here