जुलै महिन्यात लाँच होणारे ‘हे’ आहेत एका पेक्षा एक ११ दमदार स्मार्टफोन
स्मार्टफोन कंपन्या दर आठवड्याला एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करत आहे. कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच करण्यांची कंपन्यांमध्ये ओढ लागली आहे. Redmi, Realme आणि Samsung सारख्या ब्रँड्सने गेल्या काही महिन्यात जबरदस्त स्मार्टफोन लाँच केले आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमती देखील कमी आहेत. मात्र, आता या कंपन्या एवढ्यावरच थांबणार नाही. जूनप्रमाणेच जुलै महिन्यात देखील हे ब्रँड्स नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. Techno, Realme, Redmi, OnePlus, Mi, Motorola सह अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन्स जुलै महिन्यात लाँच होणार आहे.
यातील काही फोन्सची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या स्मार्टफोन्सच्या लाँचिंगची वाट पाहू शकता. जुलै महिन्यात कोणते फोन लाँच होणाची शक्यता आहे त्यांची यादी पाहुयात.
Techno Spark GO
या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. सोबतच, ड्यूल रियर कॅमेरा सपोर्ट मिळेल. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असेल. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. फिंगरप्रिंट सेंसर देखील या फोनमध्ये मिळेल. Techno Spark GO हा स्मार्टफोन ड्यूल-सिम सपोर्ट आणि मीडियाटेक हेलियो ए२० प्रोसेसर सोबत येईल.
Realme GT Master edition
या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. सोबतच, फोनध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर दिला जाईल. Realme GT Master edition स्मार्टफोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यं स्टोरेज मिळेल. पॉवरसाठी यामध्ये ४५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. हा फोन ४ जुलैला लाँच होण्याची शक्यता आहे.
REDMI k40
या फोनमध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले, ६४ मेगापिक्सल ट्रिपलर रियर आणि १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, ऑक्टा-कोर मीडियाटेक १२०० प्रोसेसर मिळेल. स्टोरेजसाठी यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. ५०६५ एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन २२ जुलैला लाँच होऊ शकतो.
OnePlus Nord 2
यामध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. यात ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यात ४५०० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.
या फोनमध्ये ६.५ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. सोबतच, १०८ मेगापिक्सलचा रियर प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर सपोर्ट मिळेल. फोन २२ जुलैला लाँच होऊ शकतो.
Mi 11 Pro
यामध्ये ६.८१ क्यूएचडी प्लस एमलोड प्लस डिस्प्ले मिळू शकता. तसेच, ५० मेगापिक्सल सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ५००० एमएएचच बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. फोनला २६ जुलैला लाँच केले जाऊ शकते.
Realme GT Neo
realme-gt-neo
यामध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस एमलोड डिस्प्ले, ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी ४५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल. तसेच, ऑक्टा-कोर मीडियाटेक १२०० प्रोसेसर मिळेल. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येणारा हा फोन ११ जुलैला लाँच होईल.
Motorola Edge S-
या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८७९ प्रोसेसरसोबत येईल. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येईल. फोनला १४ जुलैला लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
Redmi 10
redmi-10
फोनमध्ये ६.५२ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. यात १३ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर असेल. फोनमध्ये ५१०० एमएएचची बॅटरी, मीडियेटेक हेलियो जी३५ प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम दिली जाईल. फोनच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
VIVO V21 Pro
यामध्ये ६.४४ इंचचा आययपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाईल. सोबतच, ६४ मेगापिक्सलसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये ४३०० एमएएचची बॅटरी, ऑक्टा-कोर कायरो ४७५ प्रोसेसर मिळेल. फोनच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
POCO X3 GT
poco-x3-gt
POCO X3 GT स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यातील प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. पॉवरसाठी POCO X3 GT स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सोबत येईल. कंपनी फोनला ३१ जुलैला लाँच करण्याची शक्यता आहे.
सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा
परफॉर्मन्स MediaTek MT6893 Dimensity 1200 5G (6 nm)
डिस्प्ले 6.43 inches (16.33 cm)
स्टाेरेज 256 GB
कॅमेरा 64 MP + 8 MP + 2 MP
बॅटरी 4500 mAh
price_in_india 29648
रॅम 8 GB
Comment here