करमाळा

सीना-कोळगाव धरणाचे पाणी नेरले तलावात न सोडल्यास करणार तीव्र आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सीना-कोळगाव धरणाचे पाणी नेरले तलावात न सोडल्यास करणार तीव्र आंदोलन

सीना-कोळेगाव धरणाचे पाणी नेरले तलावात न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष माननीय सतीश राव निळ पाटील व नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबर राजे यांनी दिला आहे, करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण . ओव्हर फ्लो झाल्यामुळे अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आले, सिना कोळेगाव प्रकल्प वर 2उपसा सिंचन योजना आहेत. दोन्ही उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण आहे धरणाचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे कॅनोला सोडणे आवश्यक होते, परंतु प्रशासनाने ते पाणी न सोडता नदीमध्ये सोडले आहे.

एक महिन्यापासून हवामान खाते अंदाज सांगत होता या वर्षी पाऊस भरपूर होणार आहे त्यामुळे सिना कोळेगाव धरण ओव्हरफ्लो होणार अशी शक्यता सर्वांना होती तरीदेखील प्रशासनाने उपसा सिंचन योजना चालू करण्या संदर्भात कोणतेही उपाययोजना केली नाही सीना-कोळेगाव धरणासाठी शासनाने सिना कोळेगाव प्रकल्प विभाग स्वतंत्र कार्यालय परंडा येथे आहे त्या कार्यालयांमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे अनेक ठिकाणे कॅनल फुटलेला आहेत काही ठिकाणी मुद्दाम फोडले आहेत.

उपायोजना या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी करत नाहीत सिना कोळेगाव प्रकल्प मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत झाल्या त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्यासाठी करमाळा तालुक्यातील सालसे आळसुंदे नेरले आवटी ही चार गावे व परंडा तालुक्यातील अनेक गावे स्लॅब कायद्यानुसार जमिनीच्या हस्तांतर बंदी आहे कारण करमाळा तालुक्यातील चार गावे व परंडा तालुक्यातील इतर गावे येथील जमिनी काढून धरणग्रस्तांना देणे व या गावाला पाणी देणे देणे त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांना जमिनी चे कोणतेही हस्तांतर करण्यासाठी सिना कोळेगाव प्रकल्प कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते त्या परवानगीसाठी

प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गटासाठी एक हजार रुपये फी द्यावी लागते हा सर्व नियम फक्त आम्हा शेतकऱ्यांना व आहे का मग तुम्ही आम्हाला पाणी का देऊ शकत नाही पाणी देण्याचा नियम तुम्हावर बंधनकारक नाही का असा असताना देखील धरणाचे पाने एकदाही या गावांना मिळाले नाही मग कॅनल व उपसा सिंचन योजनेसाठी करोडो रुपयाचा खर्च कशासाठी केला याचे उत्तर शासनाने आम्हाला देणे बंधनकारक आहेत याबाबत पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तेव्हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी सोलापूर ज्यांना लेखी निवेदन देखील दिले आहे त्यांच्याप्रती सिना कोळेगाव प्रकल्प विभाग परांडा यांना तहसीलदार करमाळा , परांडा यांना देखिल दिलेला आहेत परंतु

त्याबाबत कुठलीही उपाययोजना किंवा हालचाल यांच्याकडून कार्यालयाकडून दिसत झालेली नाही करमाळा तालुक्यातील उजनी व कोळेगाव धरण जरी भरले असतील तरीदेखील तालुक्यामध्ये पाऊस पाऊस कमी आहे नेरले मांगी राजुरी कुंभेज तलाव तालुक्यातील अन्य तलाव. कोरडेच आहेत त्यामुळे हे तलाव भरण्यासाठी उजनी कुकडी सीना-कोळेगाव या धरणाचे अतिरिक्त वाया जाणारे पाणी सोडणे योग्य आहे त्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती व अधिकारी-कर्मचारी यांनी एक महिन्यापूर्वीच नियोजन करणे गरजे होते परंतु ते नियोजन न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींना कर्मचाऱ्यांना जनते चे काही देणे. घेणे नाही असे चित्र दिसून येते त्यामुळे आमची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्या सर्वांना विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही याचे सर्व नियोजन करून या सर्व तलावांमध्ये तात्काळ पाणी सोडावे अन्यथा आम्हाला निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करावे लागेल असा इशारा सिना कोळेगाव धरण व संघटनेचे अध्यक्ष माननीय सतीश राव निळ पाटील व नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच माननीय औदुंबर राजे यांनी दिला आहे.

litsbros

Comment here