अक्कलकोटआरोग्यपंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शरद पवार रविवारी सोलापूर दौऱ्यावर; ‘या’ गोष्टींचा घेणार आढावा

रविवारी शरद पवार सोलापूरात; ‘या’ गोष्टींचा घेणार आढावा

पवारांनी पालकमंत्री भरणे यांची विनंती केली मान्य

सोलापूर (१७ जुलै) – सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून पवार घराण्याचं सोलापूरवर विशेष लक्ष असते, हे पुन्हा दिसून येत आहे. येत्या रविवारी सोलापुरातील कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि इथली परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अा. शरद पवार येणार आहेत.
सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिशय कठीण काळात जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी उपचारासाठी फक्त सिव्हिल हाॅस्पिटल उपलब्ध होते. पालकमंत्री भरणे यांनी दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संसर्गाचा आढावा घेऊन उपाय योजना संदर्भात निर्णय घेतले. एवढेच नव्हे तर ते स्वतःच फिल्डवर उतरले.

सोलापूरातील हाॅस्पिटल्स, ओपीडी, काॅरनटाईन सेंटर, कंन्टेनमेन्ट झोन सर्व ठिकाणी धाडसाने स्वतः भेटी देऊन पाहणी केली. त्यामुळे सोलापूर शहरातील सर्व ओपीडी हाॅस्पिटल सुरू झाले, रुग्णांवर उपचार होऊ लागले. त्यानंतर लाॅकडाऊन उठवले गेले.

हेही वाचा- सर्वच पदांची भरती ‘MPSC’तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आज शुक्रवारी कोरोनाचा कहर, बार्शी एकाच दिवशी १०९ ; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण वाढले?

हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असताना सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याला रोखण्यासाठी, संक्रमण साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर, महापालिकेचे सर्व पक्षाच्या गटनेते या सर्वाची एकत्र बैठक घेतली व सर्वानी लाॅकडाऊन करण्याची मागणी लावून धरल्यामुळे लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनावर सोडला. त्यानंतर नागरिकांची मते जाणून लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला.


सोलापूरच्या सर्व निर्णयाची, उपाययोजनेची माहिती पालकमंत्री भरणे यांनी वेळोवेळी खा. शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देत होते. यांच्या निर्णय प्रक्रियेवर विश्वास आहे, म्हणूनच पालकमंत्री भरणे यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील आपत्कालीन परिस्थितीत त्यावर उपाययोजना करण्यात हातखंडा असलेले शरद पवार यांना सोलापूरचा दौरा करून प्रशासनाला कोविड विरुद्ध लढ्यात उपाय योजना संदर्भात आपल्या अनुभवाने मार्गदर्शन करावे, अशी विनंती करत प्रशासन जबाबदारीने काम करत आहे ते आणखीन गतिमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

खा.शरद पवारांनी तात्काळ पालकमंत्री यांची विनंती मान्य करून सोलापूरला येण्याचे कबूल केले. पवार यांचे पूर्वीपासूनच सोलापूरवर विशेष प्रेम आणि लक्ष असते. त्यामुळे शरद पवार रविवारी सोलापूर दौरावर येत आहेत. त्यांच्या बरोबर आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे देखील असतील.

रविवारी नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.

___________________________________________

सुपरफास्ट बातम्या मिळवण्यासाठी ‘करमाळा माढा न्यूजची’ बातमी उघडल्यानंतर खाली दिसणाऱ्या बेल आयकॉन अथवा – ALLOW बटनावर क्लिक करा,
आणि मिळवा प्रत्येक बातमी थेट मोबाईलवर.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 70 58 59 29 90
———————————————————————ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9067564080 हा नंबर तुमच्या ग्रुपला ऍड करा. किंवा वैयक्तिक लिहा “Karmala Madha News”

litsbros

Comment here