करमाळा

करमाळयात २६ नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त ‘या’ कोविड योध्दांचा होणार सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

२६ नोव्हेंबर संविधान गौरव दिनानिमित्त कोविड योध्दांचा सन्मान दशरथआण्णा कांबळे

करमाळा प्रतिनिधी(सुनिल भोसले) ;करमाळा तालुक्यातील कोरोना महामारीस आळा घालणाऱ्या कोविड योद्ध्यांचा भव्य सन्मान दि.२६ नोव्हेंबर २०२० संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने संविधान पुस्तिकेचे वाटप करून सन्मानित करण्यात येणार असल्याचे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी बोलताना सांगितले. 

यावेळी प्रशासनातील कार्यक्षम अधिकारी व पत्रकार बांधव यांचा समावेश असणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले असल्याचे सांगितले.

तालुक्यातील .पोलीस उपअधिक्षक,सो तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी मॅडम, वैद्यकीय अधिकारी सो कुटीर रुग्णालय., ता. आरोग्य अधिकारी सो, पोलीस पाटील संघटना, मा.आशा वर्कर, .अंगणवाडी सेविका सरपंच संघटना,.ग्रामसेवक संघटना,.तलाठी संघटना,.स्वच्छता कर्मचारी,न.प.संघटना पत्रकार बांधव इत्यादींचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ठिकाण डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, येथे दिनांक २६/११/२०२० रोजी सकाळी ठिक ११वा आयोजित करण्यात आला आहे.

litsbros

Comment here