पुणे

दुर्दैवी! मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू; सहा महिन्यापुर्वीच झाला होता विवाह

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी! मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने नवविवाहितेचा मृत्यू; सहा महिन्यापुर्वीच झाला होता विवाह

  जनावरांसाठी कुट्टी करतअसताना मशीनमध्ये स्कार्फ जाऊन गळफास लागल्यामुळे 21 वर्षीय नवविवाहीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोनाली दौंड, वय 21 असे या नवविवाहीत महिलेचे नाव असून सोनालीचा विवाह गेल्या सहा महिन्यापुर्वीच झाला होता. सोनाली जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी कुट्टी मशीनमध्ये चारा टाकत होती. दरम्यान तिच्या गळ्यातील स्कार्प व केस मशीनमध्ये गुंतले यावेळी काही कळायच्या आत सोनाली यांचा मृत्यू झाला. सहामहिन्यापुर्वी विवाह झालेल्या सोनालीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्यातील कंदरच्या लेकीला सेल्स टॅक्स इंस्पेक्टर पदी बढती

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी- तुमचे कृषिपंपाचे वीजबिल ‘असे’ करा ५०% माफ

रॉयल एनफिल्डच्या Bullet 350 ची ‘सवारी’ करा फक्त १८,००० रुपयांमध्ये; बघा EMI किती?

litsbros

Comment here