ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू 

नविन डीपीला विद्यूत वाहिन्या जोडताना विजेचा धक्का लागून चार मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी हिवरखेडा ( नांदगिर वाडी ) शिवारात घडली. आदिनाथ बाळकृष्ण मगर( २८ ), भारत बाबासाहेब वरकड ( ३२), गणेश नारायण थेटे ( २८ ) व जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७, सर्व रा. नावडी ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. 

कन्नड येथील हिवरखेडा ( नांदगीरवाडी ) शिवारात नविन डीपी बसविण्याचे काम सुरु आहे. येथे अर्जुन बाळकृष्ण मगर, भारत बाबासाहेब वरकड, गणेश नारायण थेटे आणि जगदीश छगनराव मुरकुंडे ( ३७) हे तारा ओढण्याच्या मजुरीच्या कामावर होते. दुपारी हे चौघे डीपीला विद्युत पुरवठा करण्यासाठी  ११ केव्ही वाहिनी जोडण्याचे काम करीत होते. 

ज्या ठिकाणाहुन विद्युत पुरवठा घ्यावयाचा तेथून नविन डीपीचेपर्यंत चौघे मिळून तार पसरवित होते. नविन डीपी कडून गणेश तार ओढीत पुढे गेला. त्यानंतर काही अंतरावर भारत तार ओढण्यास मदत करित होता. त्यानंतर काही अंतरावर अर्जुन ही मदत करित होता तर नविन डीपी जवळच जगदीश तार ओढण्यास मदत करित होता. तारेचे पहिले टोक घेऊन गणेश सहा पोलपर्यंत पोहोचला असतांना त्यात अचानक विद्युत प्रवाह उतरला. तशात जमिन ही ओलसर होती. त्यामुळे जबरदस्त शॉक लागून  चौघेही जागीच गतप्राण झाले. 

तर पप्पु शब्बीर पठाण ( ३०) हा यात गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती कळताच नावडी गावावर शोककळा पसरली.   नावडी येथील नागरीक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले.

litsbros

Comment here