करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षक संघ करमाळा कडून पोमलवाडी शाळेचा सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्राथमिक शिक्षक संघ करमाळा कडून पोमलवाडी शाळेचा सन्मान

केतूर (अभय माने ) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ करमाळा यांचे वतीने मंगळवार (ता. 5 ) रोजीं शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता.यासाठी शिक्षक संघाचे राज्य सल्लागार बाळासाहेब काळे,राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गोरे,जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले,सरचिटणीस संभाजी फुले,कार्याध्यक्ष लिंबराज जाधव,मा.चेअरमन उत्तमराव जमदाडे,दादाराजे देशमुख,वीरभद्र यादवड, विठ्ठलराव काळे,इ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वच्छ शाळा,सुंदर शाळा’अभियान मध्ये तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाने निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोमलवाडीचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हेही वाचा – अल्पसंख्यांक विभागाकडून करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी निधी मंजूर; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

ब्रेकिंग- आदिनाथ कारखान्यातील दोन ट्रक साखर शिखर बँकेने उचलली, कामगारांनी केला विरोध..

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर शेख,शहाजी देवकते,सुभाष पानसरे,अनंत पानसरे,सोमनाथ अनारसे इ शिक्षक वृंद उपस्थित होते.तसेच शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील,सरचिटणीस अमृत सोनवणे,कार्याध्यक्ष तात्यासाहेब जगताप,कोषाध्यक्ष लक्ष्मण भंडारे,प्रसिद्धीप्रमुख राजकुमार खाडे,उपाध्यक्ष मारुती ढेरे इ उपस्थित होते.

litsbros

Comment here